मुंबई

धनुष्यबाण गोठवल्यानंतर शिवसेनेचे निवडणूक आयोगालाच आव्हान...

Uddhav Thackeray| चिन्हावर निर्णय घेण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे आयोगाने सध्या हे चिन्ह गोठवले आहे.

सरकारनामा ब्युरो

Shivsena| Uddhav Thackeray| मुंबई : निवडणूक आयोगाने धनुष्यबाणाचे चिन्ह गोठवल्यानंतर शिवसेनेने पुढचे पाऊल टाकले आहे, शिवसेनेने दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून आयोगाने धनुष्यबाण चिन्ह गोठल्याच्या निर्णय़ाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. नैसर्गिक न्यायाच्या नियमानुसार न्याय झाला नसल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे.

खरी शिवसेना (Shivsena) कुणाची हा वाद निवडणूक आयोगामध्ये गेला होता. निवडणूक आयोगाने शिंदे गट आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) ला कागदपत्रे सादर करण्यासाठी सांगितले होते. निवडणूक आयोगाने चिन्ह गोठवले. यामुळे आता शिवसेना आणि शिंदे गटातील राजकारण आता आणखी चिघळणार असल्याचे दिसत आहे.

निवडणूक आयोगाने दोन्ही गटाची कागदपत्रे तपासल्यानंतर आज जवळपास आयोगाची चार तास बैठक झाली. त्यानंतर आयोगाने चिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला. शिवसेनेला पुरावा सादर करण्याचे आदेश आयोगाने दिले होते. त्यानुसार शिवसेनेने कागदपत्रांचा 700 पानांचा गठ्ठा निवडणूक आयोगाकडे सादर केला होता. मात्र, चिन्हावर निर्णय घेण्यासाठी वेळ लागणार असल्यामुळे आयोगाने सध्या हे चिन्ह गोठवले आहे. त्यामुळे आता दोन्ही गटांना नवीन चिन्ह मिळणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT