Sanjay Pawar
Sanjay Pawar sarkarnama
मुंबई

काँग्रेस, राष्ट्रवादी पवारांना तारणार? असं जुळणार ४१ मतांचं गणित

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election) आमदारांचे मतदान पूर्ण झाले आहे. कॉंग्रेसच्या उमेदवारास ४४ पैकी ४२ मते देण्यात आली आहे. त्यांच्याकडील ४ मते, राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) ९ आणि राष्ट्रवादी समर्थक अपक्षांची तीन मतेही शिवसेनेचे (Shivsena) दुसरे उमेदवार संजय पवार (Sanjay Pawar) यांना गेली आहेत. तर शिवसेनेचीही १३ मते त्यांना मिळाली आहेत. (Rajyasabha Election 2022 News Updates in Marathi)

त्यामुळे महाविकास आघाडीच्या घटक पक्षांची पहिल्या पसंती क्रमांकाची २६ मते संजय पवार यांना मिळाल्याचा दावा आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्याच बरोबर संजय पवार यांना आघाडीतील इतर घटक पक्ष आणि अपक्ष आमदारांची ही मते मिळाल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या पसंतीची ४१ मते त्यांना मिळतील असा दावा, शिवसेनेच्या वतीने करण्यात आला आहे.

दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुखांना मतदानाला जाण्यास परवानगी नाकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला 2 आमदारांच्या मतांचा फटका बसला आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांनी आव्हाडांप्रमाणे नाना पटोले यांच्या हातात मतपत्रिका दिली आहे. या दोन्ही मुद्यांवर भाजपने हरकत घेतली आहे. ही दोन्ही मते बाद करावी, अशी मागणी भाजपने केली आहे. त्यावर सध्या फेर सुनावणी सुरु आहे.

सर्व आमदारांचे मतदान जवळपास पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडीचे ४ ही उमेदवार विजयी होतील असा दावा काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला आहे. ते म्हणाले, कोणी काहीही दावा केला तरी मतांची संख्या उघड आहे. आघाडीकडे संख्याबळ आहे. एमआयएमचा हा निर्णय आहे त्यांनी कोणत्या स्तरावर हा निर्णय घेतला याची कल्पना नाही. काँग्रेसच्या 44 आमदारांचे मतदान झाले आहे. ही आघाडीची स्ट्रॅटेजी आहे. ठरल्याप्रमाणे काँग्रेसची अतिरिक्त मते आणि राष्ट्रवादी मित्रपक्षाची मते संजय पवार यांना दिली आहेत, असे त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT