gunaratna sadavarte, sanjay raut
gunaratna sadavarte, sanjay raut sarkarnama
मुंबई

गाढव तुरुंगात जाताच ‘लाल परी’ मुक्त ; गाढवांचे काय ? शिवसेनेचा सवाल

सरकारनामा ब्युरो

पुणे : एसटी कामगारांच्या संपामुळे वकील गुणरत्न सदावर्ते (gunaratna sadavarte) हे चर्चेत आले. ‘डंके की चोट पर’ असं म्हणत एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलनावर ठाम भूमिका घ्यायला लावणारे सदावर्ते सध्या अटकेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानावरील हल्ल्याप्रकरणी सदावर्तेंवर विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सध्या राज्यात विविध ठिकाणी त्यांच्याविरोधात खटले सुरु आहेत.

शिवसेनेचे मुखपत्र 'सामना'मधून त्यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ''सदावर्ते याच्या घरात फक्त नोटा मोजण्याची मशीनच सापडली नाही, तर त्याने एक गाढवही पाळले आहे. गाढव पाळणे हे काही बेकायदेशीर नाही, पण यामुळे सदावर्ते व त्याच्या कुटुंबाच्या ‘छंद’, आवडी-निवडीची कल्पना यावी. अशा व्यक्तीने लाखभर एस.टी. कर्मचाऱयांचे शोषण केले,त्यांना रस्त्यावर आणले,''अशी टीका शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

''आज सदावर्तेची वरात या न्यायालयातून त्या न्यायालयात, या पोलीस स्टेशनातून त्या पोलीस स्टेशनात सुरू आहे. सदावर्तेला गाढवांची आवड होती. त्याने गाढव पाळले, पण या महान गाढवप्रेमींना कोण पाळत होते हेसुद्धा लोकांसमोर यायलाच हवे,असे अग्रलेखात म्हटलं आहे. ''कायदा हा सामान्यांची कवचकुंडले असतो. सदावर्तेसारखे लोक कायदा आणि संविधानाचा गैरवापर करतात व सामान्यांना देशोधडीस लावतात,''असे या अग्रलेखात नमूद केलं आहे.

''सदावर्तेने परिसरातील अनेकांचे जिणे हरामच केले होते. त्यांच्याच इमारतीत राहणाऱया डॉ. प्रियंका शेटय़े या सदावर्तेच्या बायकोस जाब विचारायला गेल्या तेव्हा डॉ. प्रियंकावर हल्ला करण्यात आला व पोलीस त्याबाबत गप्प राहिले,''असा आरोप 'सामना'त करण्यात आला आहे.

  • 'सदावर्तेला गाढवांची आवड होती. त्याने गाढव पाळले, पण या महान गाढवप्रेमींना कोण पाळत होते हेसुद्धा लोकांसमोर यायलाच हवे.'

  • सदावर्तेने ही जी दादागिरी सुरूच ठेवली, त्याचे बोलवते धनी नागपूर आणि सांगलीत असल्याचे उघड झाले आहे.

  • कामगारांना देशोधडीस लावून स्वतःचे खिसे भरणारे सदावर्तेसारखे पुढारी म्हणजे माणुसकीचे शत्रूच आहेत.

  • सदावर्तेची वरात या न्यायालयातून त्या न्यायालयात, या पोलीस स्टेशनातून त्या पोलीस स्टेशनात सुरू आहे.

  • सदावर्तेसारखे लोक गाढवच आपल्या दारात बांधतात व मुक्या मेंढरासारखी जनता त्या गाढवाची पूजा करते.

  • गाढव तुरुंगात जाताच ‘लाल परी’ मुक्त झाली, गावागावांत धावू लागली!

  • वकिलीतून इतका पैसा मिळावा की, ते मोजायला यंत्र लागावे?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT