Shivsena Dasara Melava 2022 latest news Sarkarnama
मुंबई

Dasara Melava : 'गद्दारीच्या पिकाचा नायनाट कर’ ; कर्णपुरा देवीकडे दानवेंची प्रार्थना

Dasara Melava : चंद्रकांत खैरे, अंबादाल दानवे यांनी औरंगाबादची ग्रामदैवता कर्णपुरा देवीची आरती केली.

सरकारनामा ब्युरो

औरंगाबाद : शिवसेनेतील (Shivsena) दोन गटांमध्ये होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत शिवसैनिक येण्यास सुरवात झाली आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे वांद्रे येथील बीकेसी मैदानात दसरा मेळावा घेत असून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क, दादर या ठिकाणी होणार आहे.

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेनेचे नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) हे दसरा मेळाव्यासाठी औरंगाबादहून निघाले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे हे आहेत. मुंबईला येण्यापूर्वी या दोन्ही नेत्यांनी औरंगाबादची ग्रामदैवत कर्णपुरा देवीची आरती केली. शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्याला निघण्याआधी त्यांनी दसरा मेळावा यशस्वी होण्यासाठी दानवे, खैरे यांनी कर्णपुरा देवीला साकडं घातलं."या मेळाव्याला यश मिळू दे," अशी प्रार्थना त्यांनी केली.

यावेळी अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर टीका केली. मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावरही त्यांनी टीका केली. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी मराठवाड्यातून पाचशे गाड्याचे नियोजन करण्यात आले असल्याचे सत्तार यांनी म्हटलं आहे. यावर दानवे यांनी कडाडून टीका केली.

दानवे म्हणाले, "पाचशे गाड्या कुठेही नाहीत, या सगळ्या वल्गना आहेत. आम्ही एसटी महामंडळाकडूनही माहिती काढली आहे. अब्दुल सत्तार यांच्याकडून 500 गाड्या सोडण्यात आल्याचा दावा फसवा आहे,"

"गद्दारीच्या पिकाचा नायनाय करण्यासाठी देवीकडे प्रार्थना केली आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा ऐतिहासिक असतो. महाराष्ट्रात शिवाजी पार्कवरुन विचारांचं सोनं लुटलं जातं. तसंच ते आजही लुटलं जाईल," असे अंबादास दानवे म्हणाले.

इतिहासात पहिल्यांदाच शिवसेना फुटून दोन मेळावे (Dasara Melava) होत आहेत. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंनी (uddhav thackeray) ताकद दाखवण्यासाठी प्रतिष्ठा पणाला लावलीये. शिंदे गटाकडून शक्तिप्रदर्शन करण्यासाठी नियोजन करण्यात आलंय. तसंच नियोजन उद्धव ठाकरेंकडूनही करण्यात आलंय.

"धनुष्यबाण आमचाच," असा दावा दोन्ही गटांनी केला आहे. पहिला मेळावा आहे, तो उद्धव ठाकरेंचा जो शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजीपार्क मैदानावर होणार आहे. तर दुसरा मेळावा आहे तो एकनाथ शिंदे यांचा. जो बीकेसी मैदानावर होणार आहे.

याशिवाय दसऱ्याला देवीचं विसर्जन असल्यामुळे 20 हजार पोलिसांचा बंदोबस्त मुंबईत ठेवण्यात येणार आहे. एकाच वेळी होणाऱ्या दोन मेळाव्यांना कोणत्याही प्रकारचे गालबोट लागू नये यासाठी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) जय्यत तयारी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT