Mumbai News : विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनापूर्वी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत दिले आहे. विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन १६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात येणार आहे.
राज्यपालांचे अभिभाषण व विधानसभा अध्यक्षांची निवड ९ डिसेंबरला मुंबईत होणार आहे. महायुतीत कोण होणार मंत्री याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. कुणाला डच्चू कुणाला संधी मिळणार? याचं चित्र स्पष्ट होत आहे.
राज्य मंत्री मंडळात समावेश करण्यासाठी शिवसेनेच्या माजी मंत्री आणि संभाव्य मंत्री पदासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचे प्रगती पुस्तक शिवसेनेनं तयार केले आहे. या प्रगती पुस्तकात दोन माजी मंत्री नापास झाले आहेत. संजय राठोड आणि अब्दूल सत्तार यांची मंत्रिपदाची कामगिरी असमाधानकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तर शिवसेनेच्या प्रगती पुस्तकात मंत्रिपदासाठी इच्छुक असणारे 5 आमदार पास झाले आहेत. भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जून खोतकर आणि विजय शिवतारे हे आमदार पास झाले आहेत,
शिवसेनेच्या वरिष्ठ सूत्रांनी ही माहिती दिली आहे. महायुतीमध्ये शिवसेनेला १३ ते १४ मंत्री पद मिळणार असल्याची शक्यता आहे. यापैकी १० ते १२ मंत्र्यांना याच आठवड्यात मंत्रिपदाची शपथ दिली जाणार असल्याची माहिती आहे.
तानाजी सावंत
दिपक केसरकर
भरतशेठ गोगावले
गुलाबराव पाटील
उदय सामंत
दादा भूसे
शंभूराजे देसाई
संजय शिरसाट
प्रताप सरनाईक
अर्जून खोतकर
विजय शिवतारे
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.