Aaditya Thackeray Latest News, Prakash Surve Latest News Sarkarnama
मुंबई

जेवण तयार ठेवलं होतं! बंडखोर आमदार पहिल्यांदाच थेट आदित्य ठाकरेंसमोर आले अन्...

आदित्य ठाकरे आणि प्रकाश सुर्वे मागील चौदा दिवसांत पहिल्यांदाच समोरासमोर आले.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : मागील चौदा दिवसांपासून शिवसेनेतील (Shiv Sena) बंडखोर आमदार शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे यांच्यासमोर आले नाहीत. पण सभागृहातही आदित्य ठाकरे यांना बंडखोर आमदार भेटले नाहीत. पण मंगळवारी योगायोगाने आमदार प्रकाश सुर्वे (Prakash Surve) आणि आदित्य ठाकरे यांची विधानभवनात भेट झाली. दोघांनी हस्तांदोलन केलं आणि आदित्य यांनी आपली नाराजी बोलून दाखवली. (Aaditya Thackeray Latest Marathi News)

शिंदे यांच्या बंडांनंतर प्रथमच एखादा आमदार आदित्य यांच्या समोर आला असावा. विधान भवनाच्या आवारात खासदार अरविंद सावंत आणि आमदार वैभव नाईक यांच्यासोबत आदित्य ठाकरे जात असताना मध्येच त्यांना सुर्वे भेटले. यावेळी दोघांनी हस्तांदोलन केले. सुर्वे काहीसे गडबडल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

दोघांची भेट होताच आदित्य यांनी सुर्वे यांच्याशी बोलण्यास सुरूवात केली. यावेळी माध्यमांचे कॅमेरे सुरूच होते. त्यामुळे आदित्य यांचे संवाद व्हिडीओमध्ये कैद झाले. 'एवढे जवळचे असूनही. काय सांगणार मतदारसंघात जाऊन? त्यादिवशी जेवण तयार ठेवलं होतं. आम्ही तुमच्याकडे येत होतो. असं कराल खरंच अपेक्षित नव्हतं,' अशी नाराजी आदित्य यांनी व्यक्त केली.

पण आदित्य एवढ्यावरच थांबले नाहीत. ते पुढे म्हणाले, माझं तुमच्यावर खरोखर प्रेम होतं. हे तुम्हाला पण माहिती आहे. ठीक आहे बघा आता विचार करा. पण मला स्वत:ला दु:ख झालं, हे तुम्हाला पण माहिती आहे,' असं सांगत ठाकरे यांनी सुर्वे यांचा निरोप घेतला.

हा संवाद सुरू असताना सुर्वे केवळ ऐकत होते. ते एक शब्दही बोलले नाहीत. ते केवळ मान हलवत राहिले. यावेळी आमदार वैभव नाईक त्यांच्याकडे पाहून हसत होते. त्यानंतर सर्वजण तिथून निघून गेले. शिंदे यांच्या बंडानंतर पहिल्यांदाच एखादा आमदाराने आदित्य ठाकरे यांच्याशी हस्तांदोलन केले. तसेच ठाकरे यांनीही थेट संवाद साधल्याचे व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT