Narayan Rane
Narayan Rane sarkarnama
मुंबई

सरकार हे राणेंच्या म्हणण्यावर नाही, संख्याबळावर चालतं ; परब यांचा टोला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ''महाराष्ट्रात लवकरच सत्ताबदल होणार आहे. मार्चपर्यंत बदल दिसून येईल. सरकार बनवण्यासाठी, सरकार तोडण्यासाठी काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात,'' असा गैाप्यस्फोट केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जयपूर येथे माध्यमांशी बोलताना सांगितले. महाविकास आघाडी सरकारमधील परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.

परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, ''नारायण राणे काय म्हणतात, यावर सरकार चालत नाही, सरकार हे संख्याबळावर चालतं. महाविकास आघाडी सरकारकडे पूर्ण संख्याबळ आहे. त्यामुळे ठाकरे सरकार पाच वर्ष पूर्ण करेल,''

नारायण राणे हे सध्या जयपुरच्या दैाऱ्यावर आहे. एका कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलताना राणे यांनी महाराष्ट्रात भाजपचं सरकार कधी येणार, याचं उत्तर दिलं आहे. ''महाराष्ट्रात भाजपचं सरकार नसल्यानं तिथली स्थिती अशी बनली आहे. पण मार्च महिन्यात भाजपचं सरकार बनल्यानंतर तिथे अपेक्षित बदल दिसतील,'' असं राणे यांनी सांगितलं.

नारायण राणे म्हणाले, ''सरकार पाडण्यासाठी आणि बनवण्यासाठी काही गोष्टी गुप्त ठेवाव्या लागतात. माझ्या मनात ती गोष्ट आहे, ती बाहेर काढू इच्छित नाही,'' राणेंचं गुपीत नेमकं काय आहे. याचीच चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यासाठी भाजपकडून जोरदार प्रयत्न सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ज्याने मंदिर तोडलं, त्याला तोडण्याची वेळ आलीय ; भाजप आमदाराचं वादग्रस्त विधान

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रातील मच्छीविक्रेत्यांना केडीएमसीकडून परवाना वितरण करण्यास सुरुवात केली आहे . गुरूवारी मच्छीविक्रेता  परवाना वितरण कार्यक्रम भाजपच्या वतीने कल्याणतील दामोदर हॉल मध्ये आयोजित करण्यात आला होता .या कार्यक्रमासाठी मच्छी विक्रेत्यांनी गर्दी गेली होती. या कार्यक्रमात विधानपरिषदेचे आमदार व कोळी महासंघाचे अध्यक्ष रमेश पाटील ,आमदार रवींद्र चव्हाण उपस्थित होते. यावेळी केलेल्या विधानामुळे भाजपचे आमदार रमेश पाटील ( bjp mla ramesh patil) हे अडचणीत आले आहेत. “कल्याण परिसरातील मोहने येथे एका मंदिरावर विना परवानगी ज्या अधिकाऱ्याने कारवाई केली. त्याला तोडायची वेळ आली आहे,” असे वादग्रस्त विधान आमदार रमेश पाटील ( bjp mla ramesh patil) यांनी केले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT