मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी सुरतमध्ये मंगळवारी (ता. 21) सर्व बंडखोर आमदारांची बैठक घेऊन दोन महत्वाचे ठराव केले पारित केले आहेत. या ठरावाचे पत्र बुधवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारार विधानसभा अध्यक्षांना प्राप्त झालं आहे. या पत्रावर चार अपक्ष आमदारांसह 34 आमदारांच्या सह्या असून पहिली सही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांची आहे. (Eknath Shinde Latest Marathi News)
पक्ष नेतृत्वाने पक्षाच्या तत्वांशी तडजोड केल्या आमदार नाराज होते, अशी स्पष्ट भूमिका मांडण्यात आली आहे. त्यामुळे ही बैठक घेऊन ठराव करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. या पत्रावर देसाई यांच्यासह महाराष्ट्रात परतलेले बाळापुरचे आमदार नितीन देशमुख यांचीही सही आहे. अपक्ष आमदारांमध्ये बच्चू कडू, राजकुमार पटेल, नरेंद्र भोंडेकर आणि राजेंद्र पाटील यड्रावरकर यांचा समावेश आहे.
काय लिहिलं आहे पत्रात?
पोलीसांच्या बदल्यांमधील भ्रष्टाचार, तुरूंगात असलेले तत्कालीन गृह मंत्री अनिल देशमुख यांचा भ्रष्टाचार, अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याच्या कारणास्तव तुरूंगात असलेले मंत्री नवाब मलिक यांच्यामुळे आमदारांचा भ्रमनिरास झाला आहे. या कारणांसह राजकीय विचारधारा वेगळ्या असलेल्या पण सध्या सत्तेत असलेल्या पक्षांकडून पक्षातील नेत्यांना मानसिक त्रास दिला जात आहे. शिवसेना संघटन कमकुवत करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा आरोप करत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करण्यात आलं आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन केल्यानंतर शिवसेना संघटनेत मोठी नाराजी आहे. पक्षाच्या तत्वांशी तडजोड करण्यात आली आहे. मागील अडीच वर्षांत आमचा पक्ष आणि नेतृत्वाने भिन्न विचारधारेशी हात मिळवणी करून पक्षाच्या तत्वांशी तडजोड केली. पक्षाचे नेते दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेमुळे हिंदूत्वाशी तडजोड न करता स्वच्छ आणि प्रामाणिक सरकार देणं अपेक्षित होतं. पण त्या तत्वांशी भिन्न विचारधारा असलेल्या पक्षांशी हातमिळवणी करून तडजोड कऱण्यात आली, असंही पत्रात म्हटलं आहे.
भाजप आणि शिवसेनेची 2019 च्या निवडणुकीआधी युती होती. मतदारांनी युतीच्या बाजून कौल दिला. पण शिवसेनेने विरोधी पक्षांसोबत हातमिळवणी केली. पक्षनेतृत्वाच्या या निर्णयामुळे मतदार आणि पक्ष संघनेवर नकारात्मक परिणाम झाला. त्याविरोधात सतत बोलण्यात आले. पण त्याकडे दुर्लक्ष करून महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात आले. मागील दोन वर्षात आमदारांवर मतदारांचा प्रचंड दबाव आहे. मतदारांकडून प्रश्न उपस्थित केले जात असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
यापार्श्वभूमीवर शिवसेनेतील आमदारांनी आज बैठक ठराव करण्यात आले आहेत. एकनाथ शिंदे यांची 31 ऑक्टोबर 2019 रोजी विधीमंडळ गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली होती. यापुढेही तेच गटनेते असतील, हा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर भरत गोगावले यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याचा आणि सुनिल प्रभू यांची हकालपट्टी करण्याचा ठरावही बैठकीत करण्यात आला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.