kishori pednekar sarkarnama
मुंबई

Shiv Sena : बाळासाहेबाचं धनुष्यबाण पळविणाऱ्यांच्या विरोधात आम्ही लढू ; पेडणेकर आक्रमक

Kishori Pednekar : , "वारसा आम्हाला सिद्ध करायचा नाही, शिंदे गटाला सिद्ध करायचा आहे, आम्हाला ताकद लावायची गरज नाही.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना कुणाची यावरुन ठाकरे आणि शिंदे गटांमधील (Shinde group) सत्तासंघर्षाचा पेच आता निवडणूक आयोगाच्या कोर्टात गेला आहे. निवडणूक आयोगाच्या कार्यवाहीस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिल्याने शिंदे गटाला मंगळवारी दिलासा मिळाला आहे.

त्यामुळे आता खरी शिवसेना कोणाची आणि निवडणूक चिन्ह कोणाला मिळणार, याचा फैसला आता निवडणूक आयोग करणार आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या नेत्या, माजी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी शिंदे गटाला सुनावलं. त्या माध्यमांशी बोलत होत्या.

किशोरी पेडणेकर म्हणाल्या, "वारसा आम्हाला सिद्ध करायचा नाही, शिंदे गटाला वारसा सिद्ध करायचा आहे, आम्हाला ताकद लावायची गरज नाही. कटकारस्थानानं बाळासाहेबांचं धनुष्यबाण पळवणाऱ्यांविरोधात आम्ही लढू , न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. मी यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही,"

नवरात्र महोत्सवातील 'मराठी दांडिया'चे आयोजन भाजपने केले आहे. त्यावरुन भाजप आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला आहे, आजच्या 'सामना'मधून भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. त्याला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सडेतोड उत्तर दिले आहे. शेलारांच्या टि्वटला पेडणेकरांनी उत्तर दिले आहे.

"शब्दांचे फवारे उडवण्यात शेलार माहीर आहेत, देशात वेगवेगळ्या पद्धतीनं गरबा साजरा केला जातो, त्यांचा आनंद घेणं गरजेचं आहे, मात्र तुमचं राजकारण का वळवळतयं ? असा सवाल पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे.

"शिवसेनेचा दांडिया अस्सल मर्दानीच असतो. शिवसेनेच्या शाखा म्हणजे चोवीस तास लोकांसाठी उघडी असलेली जनमंदिरेच आहेत. तितकीच ती न्यायाची मंदिरे आहेत. शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची केलेली ही रचना आजही मजबूत पायावर उभी आहे. ती कमळाबाईच्या मराठी दांडियाने इंचभरही हलणार नाही," अशा शब्दात शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपा आणि शिंदे गटावर हल्लाबोल केला आहे.

"शिवसेना शिल्लक आहे म्हणून मऱ्हाठी शिल्लक आहे. हिंदुत्व बचावले आहे. शिवसेनेवर पाठीमागून घातकी वार करणाऱ्यांना याच शिवसेनेने स्वाभिमानाने जगायला शिकविले. गर्वाने ‘मराठी’पणाची कवचकुंडले दिली, पण आज तेच लोक शिवसेनेवर उलटले आहेत. स्वकीयांशी लढणे हे महाराष्ट्राचे व मराठ्यांचे दुर्भाग्य काय आजचे आहे? मुंबईवरील संकटाचा प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे,असे शिवसेनेनं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT