yashomati thakur,Sharad Pawar,kishori pednekar
yashomati thakur,Sharad Pawar,kishori pednekar sarkarnama
मुंबई

मंत्रीपद मिळालयं तर नीट काम करा ; यशोमती ठाकूर यांना पेडणेकरांचा सल्ला

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत केलेल्या विधानावर पडसाद उमटत आहेत. ''शरद पवार (NCP Sharad Pawar) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (Maharashtra CM) असते तर आज चित्र वेगळं असतं,'' असं विधान यशोमती ठाकूर यांनी दोन दिवसापूर्वी केलं. त्याला शिवसेनेच्या नेत्या, मुंबईच्या माजी मुख्यमंत्री किशोरी पेडणेकर (kishori pednekar)यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे. त्यामुळे आता पेडणेकर-ठाकूर वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही.

"आपल्याला पहिल्यांदा मंत्रीपद मिळालं आहे, त्यामुळे नीट काम करा", असा सल्ला किशोरी पेडणेकर यांनी यशोमती ठाकूर यांना दिला. त्या माध्यमांशी बोलत होत्या. त्यामुळे आता ठाकूर या पेडणेकरांचा सल्ला ऐकतील का त्याला उत्तर देतात, हे लवकरच समजेल.

''यशोमती ठाकुरांनी असे वादाचे मुद्दे तयार करु नयेत. तुमचं असंच म्हणणं जर असेल तर या मंत्रीमंडळात तुम्ही मंत्री राहील्या नसत्या. त्यामुळे तुम्हाला पहिल्यांदा मंत्रीपद मिळालंय तर नीट काम करा", असा टोला पेडणकरांनी लगावला.

अमरावती येथे डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रद्धांजलीपर कार्यक्रमाचं आयोजन काल करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला यशोमती ठाकूर यांच्यासह शरद पवार, राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार, खासदार नवनीत राणा यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमात भाषण करताना यशोमती ठाकूर यांनी शरद पवार आज मुख्यमंत्री असते तर राज्यातील सध्याचं चित्र वेगळं असतं, अशा प्रकारचं विधान केलं.

शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आणि जोरात काम करत आहे, असे विधान गेल्या महिन्यात यशोमती ठाकूर यांनी केले होते. त्यानंतर पुन्हा त्यांनी पवारांच्या विषयी असे विधान केल्याने त्याच्यावर शिवसेनेच्या नेत्यांनी टीका केली आहे. पेडणेकर यांच्यापूर्वी शिवसेना नेत्या आणि विधानसभेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe)यांनी याआधी यशोमती ठाकूर यांना प्रत्युत्तर दिलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT