<div class="paragraphs"><p>Sanjay Raut, Ajit Pawar</p></div>

Sanjay Raut, Ajit Pawar

 

sarkarnama

मुंबई

...म्हणून तेव्हा अजितदादा आणि आमदार परत आले!

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा पहाटेचा शपथविधी संपूर्ण राज्य जाणते. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मी अजित पवार यांना पाठवले असते तर पूर्ण सरकार स्थापन केले असते. असे अर्धवट काम केले नसते, असे भाष्य एका मुलाखतीमध्ये केले होते. त्यावर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली.

संजय राऊत मुंबईमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी राऊत म्हणाले, ज्याअर्थी शरद पवार हे सांगत आहेत त्याअर्थी ते खरे असायला हवे. कारण त्यावेळी भाजप सरकार स्थापन करण्यासाठी इतकी उत्तेजित झाली होती की काहीही करुन त्यांना राज्यात सत्ता स्थापन करायची होती. मग याच्याशी बोला, त्याच्याशी बोला, याला फोडा, अजित पवारांना गाठा, आमच्या लोकांना गाठा असा मोठा उपक्रम त्यांनी सुरु केला होता, अशी टीका राऊत यांनी केली.

शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला ऑफर होती. कुठून काय बोलणी सुरु होती याविषयी आम्हाला माहिती आहे. पवार देखील आमच्यासोबत यासंदर्भात बोलले होते. त्या वेळी आम्ही एकमेकांपासून कोणतीही गोष्ट लपवत नव्हतो. आमच्याकडे गुप्त असे काही नव्हते. कोण काय बोलतो, कुणाला भेटतो याबाबत पारदर्शकता होती. याबाबत भाजपला माहिती नव्हते. त्या पारदर्शकतेमुळे त्यांचे सरकार येऊ शकले नाही, अजित पवार शपथ घेण्यासाठी गेले त्यातही पारदर्शकता होती, असेही राऊत म्हणाले.

राजकारणात पारदर्शकता असायला हवी. इतकी मोठी घडामोड घडत असताना कोण काय करत आहे? उद्या काय होणार? नंतरकाय होणार?…आपण राज्यात सत्तापरिवर्तन घडवण्यासाठी चाललो होतो. कुठेही कोणता दगड आडवा येईल तो काढत राहिलो. आमच्याकडे तेव्हा जेसीबी चालूच होत्या, असा टोला राऊत यांनी लगावला. पारदर्शकता असल्यामुळेच सगळे आमदार आणि अजित पवार परत आले असेही राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT