Shiv Sena Sarkarnama
मुंबई

शिवसेनेचा गद्दारांना दणका ; विजय चौगुले, नाहटा यांची हकालपट्टी, खोतकर उपनेतेपदी

अर्जून खोतकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ पदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर अनेक शिवसेना पदाधिकारी हे शिंदे गटात सहभागी झाले, काहींनी त्यांना पाठिंबा दिला आहे. "आम्ही शिवसेनेत आहोत, असं सांगत अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील झाले. त्यानंतर पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी गद्दार शिवसैनिकांवर कारवाई करण्यास सुरवात केली आहे. (shivsena news update)

विजय चौगुले, विजय नाहटा या नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. गुरुवारी या दोघा नेत्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जाहीर पाठिंबा दिला होता. विजय चौगुले हे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते आहेत.

विजय नाहटा हे राज्य पर्यावरण समितीचे अध्यक्ष आहेत. पक्षविरोधी कारवाया केल्याने दोघांना पक्षातून हकालपट्टी केल्याचे सामना वृत्तपत्रातून जाहीर करण्यात आले आहे.

अर्जून खोतकर यांची उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अनेक पदाधिकाऱ्यांची वरिष्ठ पदावर नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते. शिंदे गटात सहभागी होत आमदार-खासदारांसोबत आता स्थानिक नेत्यांनीही सवता सुबा मांडला आहे.

ठाणे, नवी मुंबईनंतर कल्याण-डोंबिवलीमध्येही नगरसेवकांनीही शिंदेच्या सोबत राहण्यास पसंती दिल्याने शिवसेनेची स्थिती बिकट होत आहे. त्यामुळे पक्षाकडूनही आता कडक निर्णय घेण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर नवी मुंबई शिवसेना नेत्यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT