Rahul Shewale News Updates, Rahul Shewale Latest News Updates
Rahul Shewale News Updates, Rahul Shewale Latest News Updates sarkarnama
मुंबई

शिवसेना खासदार राहुल शेवाळेंवर बलात्काराचा आरोप ; पीडितेची पोलिसांत लेखी तक्रार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर बलात्काराचा आरोप नुकताच करण्यात आला आहे. हे प्रकरण समोर असतानाच अजून एका शिवसेनेच्या एका बड्या (Shiv Sena MP) नेत्यावर एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे. (Rahul Shewale Latest News Updates)

मुंबईतील साकीनाका पोलीस ठाण्यात (Sakinaka Police Station Mumbai) पीडित महिलेने लेखी तक्रार दिली आहे. शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे.

शिवसेना नेते आणि खासदार राहुल शेवाळे (Rahul Shewale) यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. शेवाळे म्हणाले की, माझ्या विरोधात लेखी तक्रार एका महिलेने दिली आहे. ही तक्रार संपूर्णपणे निराधार आहे. माझी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील प्रतिमा मलिन करणअयाच्या उद्देशाने हेतुपुरस्कर तक्रार करण्यात आली आहे,"

"मुंबई पोलीस आणि कायद्यावर माझा पुर्णतः विश्वास आहे. याबाबत पोलीस आणि न्याययंत्रणा योग्य निर्णय घेईल, असा मला विश्वास आहे. मी निर्दोष असल्याचं सिध्द करण्यासाठी कोणत्याही चौकशीसाठी तयार आहे. तसेच या तक्रारीमागे असणाऱ्या लोकांचाही पर्दाफाश लवकरच करेन," असंही शेवाळे म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, सामाजिक न्यायमंत्री,धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने बलात्काराची तक्रार मुंबई पोलिसांकडे दिली होती. संबधित महिलेने मुंडे यांच्याकडे खंडणीची मागणी केली होती. धनंजय मुंडे यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती.

मुंडे यांच्याविरोधात मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल केली होती. काही दिवसानंतर या महिलेने आपली तक्रार मागे घेतली. खंडणीप्रकरणी तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात येऊन तिला अटकही करण्यात आली होती. तर दुसरीकडे गेल्यावर्षी शिवसेनेचे नेते संजय राठोड यांच्यावर पुण्यातील तरुणी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे संजय राठोड यांनी आपल्या वनमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

22 वर्षीय पीडितेने रघुनाथ कुचिक यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. यात गुन्हाही नोंदवण्यात आला आहे. या पीडितेला मदत करत तिला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुढाकार घेतला होता. लैंगिक अत्याचाराचे आरोप रघुनाथ कुचिक यांनी फेटाळले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT