Sanjay Raut  Sarkarnama
मुंबई

मोठी बातमी : Sanjay Raut शंभर दिवसानंतर कारागृहातून बाहेर येणार ; जामीन मंजूर

Sanjay Raut : . सुनावणीच्या वेळी संजय राऊतांचे कुटुंब देखील कोर्टात उपस्थित होते.

सरकारनामा ब्युरो

Sanjay Raut: पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेची मुलुखमैदान तोफ संजय राऊत सुमारे शंभर दिवसानंतर आर्थर रोड कारागृहाबाहेर येणार आहेत. त्यांना आज जामीन मिळाला आहे.

ता. 31 जुलै रोजी संजय राऊत यांना अटक करण्यात आली होती. यांना कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्यानंतरपासून संजय राऊत हे आर्थर रोड कारागृहात होते. राऊतांना पोलिस कोठडी आणि नंतर त्यांची न्यायालयीन कोठडी झाली. तेव्हा पासून राऊत हे आर्थर रोड कारागृहामध्ये आहेत. ईडीने त्यांच्या जामीनाला विरोध केला होता. यावर तीन वाजता निर्णय होणार आहे.

पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात पीएमएलए न्यायालयाकडून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच, या प्रकरणात प्रविण राऊत यांनाही न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.

राऊतांना जामीन मंजूर झाल्याने ठाकरे गटाकडून जल्लोष करण्यात येत आहेत. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची तोफ बाहेर येऊन पुन्हा धडाडणार, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्यांनी दिली आहे.

ईडी आता संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची शक्यता आहे. राऊत यांना जामीन मिळाला असला तरी आज (बुधवार) संध्याकाळपर्यंत न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळणार आहे. त्यानंतर राऊत यांना तुरुंगाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरु होईल.

ईडीने त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी राऊत यांचा थेट हात आहे असा ईडीचा आरोप आहे. मात्र राऊतांचा या घोटाळ्याशी काहीच संबंध नाही असा युक्तीवाद राऊतांचे वकील करत आहेत. मात्र ईडीकडून राऊत हेच घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचे सांगितले जात आहे. सुनावणीच्या वेळी संजय राऊतांचे कुटुंब देखील कोर्टात उपस्थित होते. दोन लाखांच्या जातमुचलक्यावर राऊतांना जामीन मिळाला आहे.

राऊतांचा ईडीवर काय आरोप आहे?

  1. संजय राऊतांचे भाऊ प्रविण राऊत हे पत्राचाळ डेव्हलेपमेंटकडे लक्ष देत होते. त्या वेळी त्यांना एचडीआयएल ग्रुपकडून 112 कोटी रुपये मिळाले.

  2. यामधील 1 कोटी 6 लाख रुपये हे राऊतांच्या पत्नींच्या खात्यात पाठवण्यात आले. या पैशांमधून त्यांनी अलिबागेत जमीन खरेदी केली.

  3. पत्राचाळ प्रकरणात घोटाळा केल्यामुळे राऊत कुटुंबियांना मोठा फायदा झाला असा ईडीचा आरोप आहे.

  4. या पत्राचाळ डेव्हलपमेंटमध्ये प्रविण राऊत हे फक्त नावाला होते. मात्र यामागची सर्व सूत्र संजय राऊतच सांभाळत होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT