Sanjay Raut Latest Marathi News, Shivsena News, Maharashtra Political Crisis News Sarkarnama
मुंबई

जहालत, एक किस्म की मौत है और..! संजय राऊतांकडून बंडखोर आमदारांवर पुन्हा हल्ला

राऊतांकडून सातत्याने बंडखोर आमदारांवर हल्लाबोर केला जात आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांवर खासदार संजय राऊत यांनी हल्ले सुरूच ठेवले आहेत. गुवाहाटीत गेलेल्या चाळीस आमदारांचे मृतदेह परत येतील, कारण त्यांचं मन मेलेले आहे, असा हल्ला त्यांनी काही दिवसांपूर्वीच चढवला होता. त्यावरून बराच वादही झाला. पण त्यानंतर राऊत मागे हटण्यास तयार नाहीत. (Sanjay Raut Latest News)

राऊतांनी मंगळवारी सकाळी ट्विट करून पुन्हा एकदा बंडखोर आमदारांना डिवचलं आहे. तसेच आपल्या आधीच्या वक्तव्याचा अर्थ सांगण्याचा प्रयत्नही त्यांनी या ट्विटमधून केल्याचे दिसते.

राऊतांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे की, 'जहालत, एक किस्म की मौत है और जलील लोग चलती फिरती लाशें हैं,' असा प्रहार राऊतांनी केला आहे. त्यामुळे राऊतांच्या या ट्विटला आता बंडखोर आमदार कसं प्रत्युत्तर देणार, याबाबत उत्सुकता आहे.

राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर ऐतिहासिक घटना

आमदारकी वाचवायची असेल तर त्यांना कोणत्याही पक्षात जाता येईल. मनसेमध्ये (MNS) बंडखोर आमदार गेल्याने त्या पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर ती ऐतिहासिक घटना असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना (Shivsena) नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केली आहे.

शिवसेनेच्या नावावर राजकारण करणाऱ्या शिंदे गटाला ठाकरे नाव आणि हिंदुत्व दोन्ही सोडायचे नाही. अशा परिस्थितीत शिंदे गटातील आमदार राज ठाकरेंच्या मनसेत प्रवेश करू शकतात, अशी चर्चा जोर धरू लागली आहे. कारण शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. यावर राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

बंडखोर आमदार एमआयएम, समाजवादी पक्षातही जाऊ शकतात. बंडखोरांमुळे मनसेला पर्यायाने राज ठाकरे यांना मुख्यमंत्रिपद मिळणार असेल तर ती ऐतिहासिक गोष्ट असेल, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी व्यक्त केली. तसेच आमदारकी वाचवायची असेल तर ते अशा कोणत्याही पक्षात जाऊ शकतात, असेही राऊतांनी स्पष्ट केले. मात्र, ज्या शिवसेनेने त्यांना जन्म दिला, मोठे केले, त्याच पक्षाचा द्वेष करत असतील तर महाराष्ट्राची माती त्यांना माफ करणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT