नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासाठी शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) खुर्ची घेऊन जात असल्याच्या व्हायरल फोटोवरुन भाजप नेते टीका करत आहेत. त्यासंबंधी राऊत यांनी भाजप (BJP) नेत्यांचा समाचार घेतला. मात्र, भाजपवर नियमीत शेलक्या शब्दात टिका करणाऱ्या राऊतांची जीभ घसरली.
भाजप नेत्यांना संजय राऊत म्हणाले की, 'मी म्हणालो हे सगळे चु** आहेत. ते वेडे आहेत…त्यांची प्रकृती बिघडली आहे, सर्वांना मानसिक आजार झाला आहे. मी तर एनसीबीलाही त्यांची रक्तचाचणी करा असे सांगेन, असे राऊत म्हणाले.
त्या ठिकाणी अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, मुलायम सिंह यादव आणि लालूप्रसाद यादव, असे जरी कोणी नेते असते तरी त्यांनाही मी स्वत: खूर्ची आणून दिली असती. पवारांची प्रकृती, त्यांचं वय, त्यांना होणारा त्रास…ते माझ्यासोबत आले होते. त्यांना चालतानाही त्रास होत होता. त्यांना मांडी घालून बसता येत नाही. अशावेळी महाराष्ट्रातील एका पितृतूल्य, वडिलधाऱ्या व्यक्तीला मी स्वत: खुर्ची आणून दिली. हे जर कोणाला आवडले नसेल तर ही महाराष्ट्राची संस्कृती नसून नवी विकृती आहे, असा टोला राऊत यांनी लगावला.
कोणाच्या काय वेदना आहेत हे मला माहिती आहे. कोणाच्या पोटात दुखण्याचे कारण नाही. ज्यांनी अडवाणी साहेबांना आपल्यासमोर साधे उभेही राहू दिले नाही. खुर्चीचे तर जाऊ द्या…त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारु नयेत, असेही राऊत म्हणाले. तरम्यान, राऊत यांच्या या वक्तव्यावरुन भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा नाहीतर आम्ही राज्यभर आंदोलन करु असा इशारा, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.