Balasaheb Thackeray sarkarnama
मुंबई

बाळासाहेबांनी जगाला देशाची हिंदू राष्ट्र म्हणून ओळख करुन दिली : संजय राऊत

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९६ वी जयंती.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : अखंड महाराष्ट्र स्वाभिमानी, शक्तीमान, अस्मिता हे बाळासाहेबांचे योगदान आहे. बाळासाहेब हाच महाराष्ट्राचा आत्मा आहे, असे मत शिवसेनेचे (ShivSena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्ते केले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांची आज ९६ वी जयंती. यानिमित्ताने राऊत यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली. त्यावेळी ते बोलत होते.

या वेळी राऊत म्हणाले, महाराष्ट्रबाहेर आम्ही आभिमानानी सांगतो की आम्ही मराठी आहोत, याचा आत्मविश्वास बाळासाहेबांनी दिला. देशात सांगतो, आम्ही हिंदू आहेत. हिंदुत्वाची अस्मिता देखील बाळासाहेबांनी दिली. बाळासाहेबांनी जगाला देशाची हिंदू राष्ट्र म्हणून ओळख करुन दिली. बाळासाहेब आजही अमर आहेत, ते आमच्यासोबत आहेत, असेही राऊत म्हणाले.

या वेळी बोलताना राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीवरुन टीका करणाऱ्या विरोधकांना चांगलेच सुनावले. ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांची प्रकृती उत्तम आहे. विरोधकांना त्यांच्या त्यांची अधिक चिंता वाटते, असा चिमटा त्यांनी काढला. मुख्यमंत्र्यांविषयी ते नेहमी बोलत असतात, विरोधी नेत्यांच्या बिघडलेल्या प्रकृतीची ही लक्षणे आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, राज्याचे प्रमुख म्हणून जनतेशी संवाद साधतील आणि शिवसेनेच्या राजकारणाची पुढची दिशा देखील ठरवलील. भूमिकाही मांडतील, असे राऊत म्हणाले.

भाजपच्या नेत्यांनी राज्यापाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली त्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, त्यांचा वेळ जात नाही आहे. पुढील ३ वर्ष त्यांचा हेच करायचे आहे, असा टोला लगावाल. सरकारचे उत्तम चालले आहे. अशाप्रकारच्या कामांमध्ये राज्यपाल भवनाला देखील सामील केले. करु द्या. माझ्या शुभेच्छा आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT