Devendra Fadnavis, Sanjay Raut
Devendra Fadnavis, Sanjay Raut sarkarnama
मुंबई

रोखठोक राऊत : उद्धवजींच्या भाषणात तुम्हाला बांबू, मिरच्या लागल्या....

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी रविवारी भाजपवर सडकून टीका केली होती. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी जोरदार हल्ला केला होता. त्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस यांच्या टीकेला प्रत्त्युत्तर दिले. अयोध्या रामजन्मभूमी लढ्यात शिवसेनेची काय भूमिका होती, हे देखील त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय, शिवसेना हा भाजपपेक्षा कसा जुना पक्ष आहे हे सांगताना त्यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणा बाबत काहीही बोलायचे नव्हते मग एवढी मोठी पत्रकार परिषद घेऊन दखल का घेताय, असा सवाल राऊत यांनी केला. उद्धव ठाकरे यांच्या प्रत्येक वाक्याने तुम्हाला बांबू लागला, मिरच्या लागल्या, म्हणून पत्रकार परिषद घेऊन बोलावे लागले. कालच भाषण सणसणीत, दणदणीत झाल, म्हणून आपण अस्वस्थ आहात, असा टोलाही राऊत यांनी लगावला. भाजपच्या लोकांना आपल्या पूर्व इतिहासाचा विस्मरण झाले असेल तर शिबीर घेऊ, असेही राऊत म्हणाले.

पालिकेच्या निवडणुका राजकीय पक्षाकडून लढवल्या जात नाही. भाजप पहिल्या क्रमांकाचा विरोधी पक्ष आहे, तो कायम राहो, असेही राऊत म्हणाले. फडणवीस हे हल्ली गोव्यात असतात तिथे ते बोलत असतात. भाजपचा जन्म हा १९८० च्या दशकात झालेला आहे. जनता पक्षाचे पतन झाल्यावर भाजपचा जन्म झाला. शिवसेनेचा जन्म हा १९६९ चा आहे. शिवसेनेचा पहिला महापौर हे मुंबई शहरात डॉ. गुप्ते हे कधी झाले, त्यावेळी आमचे किती नगरसेवक निवडून आले होते. या संदर्भातील एखादे अभ्यास शिबिर आम्ही रामभाऊ म्हाळगी प्रबोधनीत ठेवू, असे राऊत म्हणाले.

शिवसेनेचे पहिले आमदार वामराव महाडिक हे देखील त्याच काळात निवडून आले. शिवसेनेच्या स्थापनेनंतर गिरगावातून प्रमोद नवलकर हे आमदार म्हणून निवडून आले होते. माझगावामधून छगन भुजबळ हे निवडून आले होते. आमचे वाघ मुंबईतून निवडून आलेले आहेत. भाजपच्या जन्माच्या अगोदर. आता फडणवीस यांचा तेव्हा मुंबईशी फारसा संबंध नसेल, महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंध नसेल कारण या सगळ्या गोष्टी फडणवीस यांच्या जन्माच्या अगोदरच्या, आहेत असा टोला राऊत यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT