Sanjay Raut News, Rajya Sabha Election 2022
Sanjay Raut News, Rajya Sabha Election 2022 sarkarnama
मुंबई

घोडेबाजारासाठी पैसा कुठून येतो ? ; आमदारांना प्रलोभन दाखवणारे सुत्रधार कोण ?

सरकारनामा ब्युरो

मुंबई : "राज्यसभेसाठी सध्या जो घोडेबाजार सुरु आहे. याच तपास ईडीनं करावा," असे शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी यांनी आज सांगितले. ते माध्यमांशी बोलत होते. "महाराष्ट्रातील राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. 'घोडेबाजार' हा शब्द वाईट आहे, काही जण आमदारांना प्रलोभन दाखवत आहेत, या आकडे मागचे सुत्रधार कोण आहेत, याचा विचार राज्यातील जनतेनं करणं गरजेचं आहे, त्याचा अभ्यास ईडीनं केला पाहिजे," असे राऊत म्हणाले. (Rajya Sabha Election 2022 News Updates)

महाविकास आघाडीचे नेते फडणवीसांना भेटायला गेले यावर राऊत म्हणाले, "राज्यसभा निवडणुकीचं राज्यात जे वातावरण आहे, त्यामुळे राज्याच्या हितासाठी महाविकास आघाडीचे नेते विरोधी पक्षनेत्यांना भेटत असतील, तर ही चांगली बाब आहे. फडणवीस हे मॅच्युअर नेते आहेत,"

राऊत म्हणाले. "आमदार विकत घेण्यासाठी जी प्रलोभने दाखवली जात आहेत, त्यामागचे सूत्रधार कोण आहेत, याचा महाराष्ट्राच्या जनतेनं विचार करणे गरजेचे आहे. केंद्रीय यंत्रणांनी तपास करणं गरजेचं आहे. घोडेबाजार नावाचा जो शब्द आहे, तो अत्यंत वाईट पद्धतीने महाराष्ट्रात सुरू झाल्याचं मला दिसत आहे. राजकारणात जो पैसा येतो तो कुठून येतो याचा तपास ईडीने करायला हवा. राज्याच्या हितासाठी,घोडेबाजार टाळण्यासाठी महाविकास आघाडीने एक पाऊल पुढे टाकत फडणवीसांशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला आहे,"

"मंदिरांपेक्षा, मशिदींपेक्षा काश्मिरी पंडित, तिथले हिंदू-मुस्लिम नागरिक यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. मोहन भागवत बरोबर बोलले. आज जे पलायन सुरू आहे, आज ज्या हत्या सुरू आहेत, त्यावर काश्मीर फाइल्स 2 चित्रपट काढावा," असा टोमणा राऊतांनी यावेळी भाजपचे नाव न घेता लगावला. (Sanjay Raut News in Marathi)

जम्मू काश्मीरमध्ये दोन बिगर काश्मिरींची हत्या झाली.यावर राऊत म्हणाले," काश्मिरींची परिस्थिती खूप गंभीर आहे, आज पुन्हा 1990 सारखी परिस्थिती झाली आहे. 370 हटवल्यानंतरही काश्मिरी जनतेच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा नाही,"

"काश्मिरमध्ये सरकारकडून कोणतीही सुरक्षा नाही, जर हे एखाद्या दुसऱ्या पक्षाच्या कार्यकाळात झालं असतं, तर भाजपनं काश्मिरी पंडितांच्या नावावर मोठा गोंधळ घातला असता. पण आता दिवसाढवळ्या हत्या होत आहे, ही परिस्थिती चांगली नाही, " अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT