K. Chandrasekhar Rao, Uddhav Thackeray
K. Chandrasekhar Rao, Uddhav Thackeray sarkarnama
मुंबई

राऊतांचा तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनाही ‘तोच’ कानमंत्र, पण माईकनं केला घोळ!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : तेलंगणाचे (Telangana) मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी रविवारी (ता.२०) दुपारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुंबईत भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी दोन्ही नेत्यांनी भाजपवर जोरदार शरसंधान साधले. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊतही (Sanjay Raut) पत्रकार परिषदेत उपस्थित होते.

राऊत यांनी पत्रकार परिषदेला सुरूवात करून दिल्यानंतर राव यांना बोलण्याची विनंती केली. पण राव बोलण्याआधीच राऊतांनी त्यांना कानमंत्र दिला. ते अत्यंत हळू आवाजात बोलल्याने राव यांनाही सुरूवातीला ऐकू आलं नाही. त्यामुळे राऊतांनी पुन्हा त्यांना कानात सांगितले. पण राऊतांचा हा कानमंत्र लपून राहिला नाही आणि त्याचा उपयोगही झाला नाही. राऊत बोलत असताना माध्यमांच्या माईकने त्यांचा आवाज टिपला होता.

'नो क्वेशन अॅन्सर' असं राऊतांनी मुख्यमंत्री राव यांच्या कानात सांगितले होते. हे शब्द माईकमध्ये स्पष्टपणे ऐकू आले. राव यांनीही त्याला होकार दिला. पण त्यांचे बोलून झाल्यानंतर माध्यम प्रतिनिधींच्या काही प्रश्नांना त्यांनी उत्तरंही दिली. राऊत यांनी शिवसेना भवनात काही दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपच्या नेत्यांवर आरोप केल्यानंतर प्रश्नोत्तरे टाळली होती. तोच सल्ला त्यांनी राव यांनाही दिला. पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

दरम्यान, पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे स्वागत करतो. अनेक दिवसांपासून भेट होणार, होणार असे बोलले जात होते. त्यानंतर आज हा दिवस उजाडला. आम्ही भेटही काही असी नाही की आत एक बोलायचे आणि बाहेर एक बोलायचे असे नाही, असे म्हणत त्यांनी भाजपला (BJP) टोला लगावला. दिवसागणीत देशातील राजकारण गढूळ होत चालले आहे. देशात सुडाचे राजकारण सुरु झाले आहे. आमचे हिंदूत्व असे नाही, त्यामध्ये सुड भावना नाही, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला.

राज्याचे मुख्यमंत्री, देशाचे पंतप्रधान कोणीही होईल. मात्र, सुडाचे राजकारण नको. देशाचाही विचार झाला पाहिजे असेही ठाकरे म्हणाले. तो विचार आम्ही करायला सुरुवात केली आहे. संपूर्ण देशामध्ये राज्य एकमेकांचा शेजारधर्म विसरले आहेत. राज्यात चांगले वातावरण राहिले पाहिजे. हे राजकारण देशाला परवडणारे नाही. एका नव्या विचारांची सुरुवात झाली आहे. त्याला आकार उकार यायला वेळ लागेल, असेही ते म्हणाले.

आम्ही काय केले हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय केले नाही हे खोट्या पद्धतीने सांगणे सुरु आहे, आम्ही आता दिशा ठरवली आहे. त्यामध्ये जसजसी प्रगती होईल तसे आपल्यासा सांगितले जाईल. पश्चीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला वेगळे ठेऊन दिसऱ्या आघाडीची भूमिका मांडली आहे. त्यावर पत्रकारांनी विचारले असता, के. चंद्रशेखर राव म्हणाले, आज एक सुरुवात झाली आहे. देशातील इतर नेत्यांशीही आम्ही बोलणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT