Eknath Shinde | Rajan Vichare Sarkarnama
मुंबई

कुंपणावरील खासदार राजन विचारे यांना आपल्याकडे ओढण्यासाठी शिवसेनेचे पाऊल

Shivsena | Eknath Shinde | Rajan Vichare : खासदार राजन विचारे एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय समजले जातात.

ऋषीकेश नळगुणे

मुंबई : शिवसेनेत सध्या पक्षांतर्गत मोठी उलथापालथ होत असून राज्य विधिमंडळात शिवसेनेचा (Shiv Sena) नेमका पक्षनेता, प्रतोद कोण यावरून कायदेशीर लढाई सुरु आहे. अशात आता खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेकडून लोकसभेतीलही पक्ष प्रतोद बदलले आहेत. खासदार भावना गवळी यांची मुख्य प्रतोद पदावरून उचलबांगडी करण्यात आली असून त्यांच्या जागी खासदार राजन विचारे (Rajan Vichare) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. (Bhavana Gawlai Latest News)

शिवसेनेचे संसदीय पक्षनेते खासदार संजय राऊत यांनी संसदीय कार्य मंत्री प्रल्हाद जोशी यांना याबाबतचे पत्र लिहून कळवले आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शिवसेनेने ज्या राजन विचारे यांची नियुक्ती केली आहे, तेच सध्या शिवसेना आणि शिंदे गट या दोन बाजूच्या कुंपणावर उभे असल्याच्या चर्चा आहेत. ते एकनाथ शिंदे यांचे अत्यंत निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे ते शिंदे गटात सामिल होणार असल्याचं बोललं जात आहे.

धर्मवीर चित्रपटामध्येही शिंदे आणि विचारे यांच्या मैत्रीविषयीची कथा दाखविण्यात आली आहे. चित्रपटामध्ये खासदार विचारे आणि एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आनंद दिघे यांचे असलेले प्रेम, माया, अशा अनेक गोष्टी दिसून येतात. त्याचवेळी पक्षातील भूकंप सोडून विचारे मागील ८ ते ९ दिवसांपासून अमरनाथ यात्रेवरती गेले आहेत. त्यामुळे या कुंपणावरील खासदार विचारे यांना आपल्याकडेच ओढण्यासाठी शिवसेनेने त्यांच्यावर जबाबदारी दिली असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान या गवळी यांच्या उचलबांगडीमागे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पाठराखण करणे खासदार गवळींना भोवल्याची चर्चा आहे. बंडखोर आमदारांच्या संपर्कात सेनेचे १२ खासदार असल्याचा दावा आमदार गुलाबराव पाटील यांनी बुधवारी केला आहे. तसेच इतर बंडखोर आमदारांकडूनही तसे संकेत मिळत आहेत. त्यातच भावना गवळी यांनी पत्र लिहून शिंदे यांच्याशी जुळवून घेत भाजपसोबत जाण्याची मागणी केली होती. त्यामुळे खासदारही महाविकास आघाडीच्या मुद्दावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याबाबतच्या चर्चांना ऊत आला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT