Eknath Shinde and Uddhav Thackeray Sarkarnama
मुंबई

Shinde Vs Thackeray: 'घरी बसणारा मुख्यमंत्री हवा की दिल्ली ते गल्ली फिरणारा'; शिंदेंचा ठाकरेंना टोला

Eknath Shinde VS Uddhav Thackeray: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.

Ganesh Thombare

Mumbai News: जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा बहाल करणारे कलम 370 रद्द केल्यानंतर या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. यावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी ऐतिहासिक निर्णय देत कलम 370 रद्द करण्याचा निर्णय योग्यच असल्याचा निर्वाळा दिला. यानंतर देशभरातून राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत.

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली असून "सुप्रीम कोर्टाने लोकांच्या मनातील निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाचे मनापासून स्वागत करतो, कलम 370 हटवलं जावं हे बाळासाहेब ठाकरे यांचंही स्वप्न होतं, असं शिंदे म्हणाले.

याचवेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली. "मी विचारतो की घरी बसणारा मुख्यमंत्री हवा की दिल्ली ते गल्ली फिरणारा", असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मुख्यमंत्री शिंदे यांनी जुहू बीच येथे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत ट्रॅक्टर चालवलं होतं. मात्र, यावरूनच उद्धव ठाकरे यांनी जोरदार टीका केली होती. तर आदित्य ठाकरेंनीही मुख्यमंत्र्यांवर टीका करत "समुद्रात कुणी ट्रॅक्टर चालवतं का ?", असा सवाल केला होता. आता या टीकेला मुख्यमंत्री शिंदेंनी प्रत्युत्तर दिलं आहे.

शिंदे म्हणाले, "संपूर्ण माहिती नसताना ते बोलतात हे दूर्दैव आहे. त्यांनी तो ट्रॅक्टर कसला होता त्याची माहिती घ्यायला पाहिजे होती. तो ट्रॅक्टर समुद्र बीचवरील कचरा काढणारा ट्रॅक्टर होता. पण मी कुठेही गेलो तरी त्यांना अडचण होती, म्हणून मी विचारतो की घरी बसणारा मुख्यमंत्री हवा की दिल्ली ते गल्ली फिरणारा ", असं म्हणत शिंदेंनी ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

(Edited by-Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT