MLA Shahaji Patil Latest Marathi News
MLA Shahaji Patil Latest Marathi News Sarkarnama
मुंबई

शहाजीबापूंनी विधानभवनात रुबाबात एन्ट्री केली अन् तो नारा घुमला!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : काय झाडी... काय डोंगार... काय हाटेल.... समदं ओकेय... या संभाषणावरून राज्यभरात चर्चेत आलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी (बापू) पाटलांनी विधान भवनात रुबाबाबत 'एन्ट्री' केली आणि पुन्हा काय झाडी, काय डोंगारचा नारा घुमला. विशेष अधिवेशनाच्या पहिल्याच वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्यांची नजर खेचून घेतलेले पाटील काहीच न बोलता स्मितहास्य करीत निघून गेले. तरीही कॅमेऱ्यांनी मात्र त्यांची पाठ सोडली नाही. (Shiv Sena MLA Shahaji Patil Latest News)

विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनासाठी मुंबईत आलेल्या शिवसेनेतील बंडखोर आमदार रविवारी सकाळी विधान भवनात आले. ताज प्रेसिडेंटमधून फोर्ट येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून हे आमदार सकाळी सव्वादहा वाजता विधान भवनात आले.

बंडखोरीनंतर म्हणजे, १३ दिवसांत पहिल्यांदाच हे आमदार तेही एकत्र असल्याने सकाळीपासून त्यांच्या 'एन्ट्री' ची उत्सुकता होती. त्यामुळे विधान भवनाच्या आवारात माध्यमांच्या प्रतिनिधींची गर्दी होती. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे आमदार विधान भवनात आले. त्यानंतर काही मिनिटांत शिंदे यांच्यासमवेत त्यांच्यातील गटातील आमदारांचा प्रवेश झाला.

त्यात साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले, ते काय झाडी...काय डोंगार असे सांगून गुवाहाटीत भलतेच खूष असलेल्या शहाजी पाटलांनी. या गटातील बहुतांशी आमदार हे शिंदेंसोबत पुढे आले. त्यात पाटील दिसले नाहीत. मात्र, ते शेवटी एकटेच भगवा फेटा बांधून आलेले पाटलांनी काय झाडी, काय डोंगार म्हणून हाक दिली गेली.

माध्यमांच्या प्रतिनिधींनी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला; मात्र, ते तसेच पुढे गेले. बंडखोरीनंतर गुवाहाटातील गेल्यानंतर पाटील आणि त्यांच्या कार्यकर्त्यांमधील ऑडिओ क्लिप व्हायर झाली. तेव्हा सोशल मीडियावर पाटलांची चलती आहे. त्यामुळे प्रत्यक्ष माध्यमांपुढे आल्यानंतर पाटील काय बोलणार याची उत्सुकता होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT