Maharashtra political news : ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जावयच्या पुण्यातील रेव्ह पार्टीवर राज्यातील राजकारण तापले असताना, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकारावर वेगळीच शंका घेतली आहे.
भाजप महायुती सरकार पोलिसांचा वापर करून घेत असून, निःपक्षपणे चौकशी होऊ द्या. सत्य काय आहे समोर येईल. परंतु तसे हे सरकार होऊ देणार नाही, असा आरोप करताना भाजपचे लोक सत्तेसाठी विरोधकांच्या कुटुंबापर्यंत पोचू लागल्याचे गंभीर निरीक्षण संजय राऊत यांनी नोंदवले.
महायुती सरकारच्या, अशा कारभाराचे वाभाडे काढताना, एकनाथ खडसेंच्या जावयाबरोबरच नवाब मलिक यांचा जावयावरील कारवाई, अभिनेता शाहरूख खान याचा मुलगा आर्यन याचे ड्रग्स प्रकरण आणि अहिल्यानगरमधील शिवसेनेचे शहरप्रमुख किरण काळे यांच्या बलात्काराच्या प्रकरणापर्यंत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सर्वच काढले.
संजय राऊत यांनी भाजपवर (BJP) टीका करताना म्हणाले, "महाराष्ट्रातील राजकारणात आम्ही पथ्य पाळतो. कुटुंबापर्यंत आम्ही पोचलो नाही. दुर्दैवाने भाजपचे लोक कुटुंबापर्यंत पोचू लागले आहे. एकनाथ खडसे गेल्या तीन दिवसांपासून हनी ट्रॅपवर बोलत होते. काही लोकांना अटक केली आहे. त्यांची नीट चौकशी करण्याच्या सूचना आहे. गिरीश महाजन यांच्या सहभागाविषयी बोलत आहेत. त्याच्यावर तपास नाही, त्याच्यावर रेट पडत नाही. पोलिसांना त्यासंदर्भात जाग नाही. एकनाथ खडसे बोलताय, म्हणून खडसेंच्या जावयाला असं उचललं".
'महाराष्ट्रात हे सर्वत्र सुरू आहे. जो तुमच्याविरोधात बोलेल त्याच्याकडे जात आहे. पोलिस घरात घुसत आहे. पोलिस चाकर झालेले आहे. भाजप हीच एक रेव्ह पार्टी झाली आहे, गुंडांची! अख्या भाजपमध्ये रेव्ह पार्टीचा माहोल आहे', असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
'खोटे आरोप, खोटे गु्न्हे दाखल करायचे. लोकांना त्रास द्यायचा. बलात्काराचे, खुनाचे, रेव्ह पार्टीचे गुन्हे दाखल होत आहे. पोलिसांना लाज वाटली पाहिजे. खाकी वर्दी घातली आहे. शपथ घेतली आहे. नि:पक्ष तपासाची शपथ घेतली आहे', याची आठवण देखील संजय राऊत यांनी पोलिसांना करून दिली.
'रेव्ह पार्टीतील नाव जाहीर करण्याची एकनाथ खडसें आमचे राजकीय काम सुरू होती, हे सांगताना, एकनाथ खडसेंचे तोंड बंद करण्यासाठी, खडसेंच्या घरावर हल्ला केला. अगोदर नवाब मलिक यांच्या जावई समीर खान याला अशाच प्रकारच्या गुन्ह्यात अटक केली. समीर खान याला अमली पदार्थाच्या व्यापारात अटक केली. पण त्याच्याकडे काहीच नव्हते. त्याच्याकडे जे सापडली, ती सुगंधी सापडली. ती भारतात बॅन आहे. यात त्याला सहा महिन्यांपेक्षा जास्त काळा तुरुंगात राहावं लागलं', असे संजय राऊत यांनी म्हटले.
'आर्थन खान, शाहरूख खान याच्या मुलाविरुद्ध, याच पोलिसांनी, याच अधिकाऱ्यांनी, अशा प्रकारची कारवाई केली. याच सरकारने रेव्ह पार्टीचा प्रकार केला आहे, असे सांगताना अहिल्यानगरमधील शिवसेनेचा शहरप्रमुख किरण काळे याच्यावर बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल केला. एक बाई उभी करून हा गुन्हा दाखल केला आहे. का?', असा प्रश्न संजय राऊत यांनी केला.
'अहिल्यानगरमधील आमदार संग्राम जगताप आणि महापालिकेतील 400 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड करून जनआंदोलन उभं केलं. २४ तासात पहाटे तीन वाजता पोलिस गेले अन् त्याला बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली किरण काळे याला अटक केली. पोलिसांचं हे आमच्या कर्तृत्व आहे, महाराष्ट्रातल्या. फडणवीसांच्या. लाज वाटली पाहिजे गृहमंत्र्यांना, काय चाललं आहे महाराष्ट्रात?', असा सवाल देखील संजय राऊत यांनी केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.