Shivsena| Eknath Shinde|  
मुंबई

शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला; निवडणूक आयोगात आजपासून राजकीय नाट्याचा दुसरा अंक सुरु

Election Commission| Shivsena| Eknath Shinde| आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्रातील राजकीय नाट्याचा दुसरा अंक आजपासून (८ ऑगस्ट) केंद्रीय निवडणूक आयोगात (Election Commission ) पाहायला मिळणार आहे. खरी शिवसेना (Shivsena) कुणाची यावरुन उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath shinde) गटात सध्या संंघर्ष सुरु आहे. आज निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. यामुळे आज निवडणूक आयोगाच्या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

शिवसेना आणि शिंदे गटाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना आयोगाने निर्णयाची घाई करु नये, अशी विनंती शिवसेनेकडून करण्यात येणार आहे. आयोगाकडे दाद मागण्याचा शिंदे गटाला हक्क नाही. ज्यांनी आयोगाकडे धाव घेतली आहे त्यांच्यावरच अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे त्यांना आयोगाकडे दावा करण्याचा हक्कच नसल्याचा युक्तीवाद शिवसेनेच्या वतीने करण्यात येणार आहे.

आजच्या सुनावणीदरम्यान, शिवसेनेची घटना, गेल्या काही वर्षातल्या पक्षांतर्गत निवडणुकांचा इतिहास, त्या त्या पदांची जबाबदारी आदी अनेक गोष्टी आयोगासमोर सादर केल्या जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 19 जुलै 2022 रोजी निवडणूक आयोगाला पत्र लिहीले होते. यात त्यांच्या नेतृत्त्वाखालील गटाला शिवसेना म्हणून मान्यता देण्याची आणि शिवसेनेच चिन्ह धनुष्यबाण मिळावं अशी मागणी केली आहे. त्यानंतर आयोगाने शिवसेना आणि शिंदे गटाला आपापल्या बाजू मांडण्यासाठी ८ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. तसेच सर्वोच्च न्यायालयाने आयोगाच्या कार्यवाहीला थेट स्थगिती दिल्यामुळे आयोग आज काय भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सर्वोच्च न्यायालयातील बदलत्या तारखांमुळे राज्यातला सत्ता संघर्षाचा तिढाही लांबण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यातच सर्वोच्च न्यायालयातील उद्या होणारी सुनावणी आता लांबणीवर पडली आहे. शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट यांच्या याचिकांवर आता 12 ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

त्यातच सध्याचे सरन्यायाधीश एन.व्ही. रमण्णा येत्या 26 ऑगस्टला निवृत्त होत आहेत. त्यात ही सुनावणी लांबत असल्याने खंडपीठ बदलणार की हेच राहणार का याबद्दलही प्रश्न उपस्थित होत आहेत. 12 ऑगस्टला शुक्रवार त्यानंतर न्यायालयाच्या सलग सुट्ट्यांमुळे सुनावणी आणखी पुढे जाण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. त्यातच सुनावणी लांबल्यानं राज्य मंत्रिमंडळ विस्तारही लांबल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT