Ayodhya Paul Ink Attack  Sarkarnama
मुंबई

Ayodhya Paul Inc Attack : ''अयोध्या पौळ यांच्यावर खरंच शाई फेक झाली का?''

Naresh Maske News : ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक झाल्याची व मारहाणीची घटना घडली आहे.

शर्मिला वाळुंज

Kalyan-Dombivli News : ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक झाल्याची व मारहाणीची घटना घडली आहे. यावर शिवसेनेचे (Shiv Sena) प्रवक्ते नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आयोध्या पौळ यांच्यावर खरेच शाई फेक झाली आहे का? की स्वतःहून करून घेतली, असा सवाल त्यांनी केला.

मस्के म्हणाले, त्यांची ती व्हायरल क्लिप संपूर्ण पहा त्यामध्ये त्या हसताना दिसत आहेत. हल्ली काय होते कोणीही काही केले तरी आमच्यावर नाव घ्यायचे पण पोलिसांना विनंती आहे, की त्याची सविस्तर चौकशी करा. अयोध्या पौळ यांच्या प्रकरणावर म्हस्के (Naresh Maske) म्हणाले, त्या व्हायरल क्लिपमध्ये त्या हसत आहेत, त्यांच्यावर नक्की शाई फेक झाली का की करून घेतली, असा सवला त्यांनी उपस्थित केला.

आपण पाहतो की धमकी दिली जाते, बरोबरची माणसे देत आहेत, काय देत आहेत. त्यांची क्लिप पहा आणि माझ्या माहितीनुसार त्या ठिकाणी काहीतरी कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमांमध्ये त्यांना बोलावले होते. त्या ठिकाणी महापुरुषाला हार घालण्यावरून काहीतरी भांडण झाले. त्यानंतर त्यांनी काहीतरी भाषण केले आणि त्या भाषणाचा राग आला म्हणून काहीतरी तो प्रकार झाला.

मात्र, हल्ली काय होते कोणीही काही केले तरी आमच्यावर नाव घ्यायचे अस झाले आहे. माझी पोलिसांना विनंती आहे की जर कोणी असा प्रकार केला असेल त्यांच्यावर कडक कारवाई करा. त्यांना बोलवा त्यांची चौकशी करा आणि जे कोणी यामध्ये दोषी असतील त्यांच्यावरती तुम्ही योग्य ती कारवाई करा.

उद्धव बाळासाहेब ठाकरे (uddhav-thackeray) गटाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. केवळ कुणाच तरी नाव घ्यायचे. त्यांना कोणी निमंत्रण दिल, काय दिल ते त्यांना माहिती. जर त्यांना निमंत्रण कोणी दिल हेच जर माहिती नसेल आणि अशा पद्धतीने जर आरोप करत असतील तर हे चुकीचे आहे. माझी त्या ताईंना सुद्धा विनंती आहे बाळा जे काही खरच झाले ते सांगा. पोलिसांनी देखील कोणत्या महापुरुषांच्या संदर्भात त्या महिलेने काय वक्तव्य केलं आणि कशावरून भांडण झाले हे त्या ठिकाणी जाऊन चौकशी करा, म्हणजे सत्य परिस्थिती समजेल असे सांगितले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT