Legislative Council Elections
Legislative Council Elections Sarkarnama
मुंबई

Legislative Council Elections : ठाकरेंनी केला करेक्ट कार्यक्रम; आघाडीत नवीन ट्वीस्ट : नागपुरची जागा शिवसेनेला

सरकारनामा ब्यूरो

Legislative Council Elections : राज्यातील पाच विधान परिषदेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) नेत्यांची बैठक झाली. त्यामध्ये विधान परिषदेचे जागावाटप फायनल झाले. त्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रदेशाध्य जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केली.

त्यामध्ये अमरावती आणि नाशिकची जागा काँग्रेस लढवणार आहे. तर मराठवाड्यातील जागा राष्ट्रवादी लढवणार आहे. कोकणात शेकाप निवडणूक लढवणार आहे. मात्र, यामध्ये काँग्रेसची नागपूरची जागा शिवसेना लढवणार आहे. त्यामुळे विधान परिषदेमध्ये ठाकरेंना एक जागा मिळाली आहे.

यावेळी जयंत पाटील म्हणाले, महाविकास आघाडी एकत्र निवडणूक लढवणार आहे. आघाडीचे एकमत झाले आहे. नागपुरची जागा निवडणून आण्यासाठी काँग्रेस प्रयत्न करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले, पाचही जागा आघाडी निवडणू आणणार असल्याचा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, अमरावती (Amravati) पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजपला प्रहार जनशक्तीने आव्हान देत उमेदवार रिंगणात आणला आहे. हा उमेदवार प्रभावी ठरणार नाही, असा दावा भाजपकडून करण्यात येत असला तरी मतांचे विभाजन करू शकणार आहे. त्याचा फटका भाजपला बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

कॉंग्रेसने अमरावतीमध्ये धिरज लिंगाडे यांना उमेदवारी दिली आहे. महाविकास आघाडी एकत्र येऊन लढते, तेव्हा काय होते, हे गेल्या वर्षी झालेल्या नागपूर (Nagpur) पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत बघायला मिळाले. अभिजित वंजारी यांनी भाजपच्या उमेदवाराचा पार सफाया करून टाकला होता. येथेही कॉंग्रेसने नुटा आणि विज्युक्टासारख्या संघटनांचे पाठबळ मिळविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे महाविकासची रणनीती बघून भाजप पावले टाकत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT