Sanjay Raut : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे गटाने धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष गमावल्यानंतर आता खासदार संजय राऊत यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना पक्ष पुन्हा फिनिक्सपक्षाप्रमाणे झेप घेईल,असा आशावाद राऊत यांनी व्यक्त केला. काळाच्या पोटात काय काय दडलेलं असतं, हा येणारा काळच सांगेल. ज्या लोक गद्दारीकरून तिकडे गेलेत, ते आता निवडून येणार नाहीत. महाराष्ट्राच्या, मराठी जनतेमध्ये भावनिक वातावरण निर्माण झालं आहे, असे ही राऊत म्हणाले.
ठजनतेमध्ये याबद्दल चीड आणि संतापही आहे. पक्ष आणि चिन्ह बळकावण्याचा कट पुर्वनियोजित होता. आता पक्ष फोडला गेला. यामागे दिल्लीची सत्ता आहे, असा आरोपही राऊतांनी केली. देशामध्ये लोकशाहीच्या नावाने राजकीय हिंसाचार सुरु झाले आहे," असेही राऊत म्हणाले.
40 आमदार म्हणजे शिवसेना नाही :
ज्यांना तिकडे उड्या मारायच्याच होत्या, त्यांनी ते मारल्या आहेत. अशी उडी घेणारे म्हणजे शिवसेना नाही. 40 आमदार आणि 12 खासदार म्हणजे शिवसेना पक्ष होत नाही. जी जमिनीवर, गावागावात शिवसेना आहे, तीच खरी शिवसेना आहे. याच शिवसेनेमुळे हे लोक निवडून आले. आमदार खासदार झाले. पण, याचा विचार आयोगाकडून केला गेला नाही. किती आमदार फुटले यावरुन धनुष्यबाणाचा निर्णय घेण्यात आला आहे. असा निर्णय कोण घेतं? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला. निर्णय कोणी घेतं का? असा सवालही राऊतांनी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.