Sanjay Raut, Sanjay Pawar
Sanjay Raut, Sanjay Pawar sarkarnama
मुंबई

विषय संपला : शिवसेनेचा दुसरा उमेदवार फायनल; दोन संजय जाणार राज्यसभेत

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांना राज्यसभेसाठी शिवसेना पाठिंबा देणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. सहाव्या जागेसाठी कोल्हापूरातीलच संजय पवार (Sanjay Pawar) यांच्या नावावर शिवसेनेने (Shivsena) शिक्कामोर्तब केले आहे. या संदर्भात लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, अशी माहिती शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेवर कुणाला संधी मिळणार याचा सस्पेन्स आता संपला आहे. (Rajya Sabha Election Latest Marathi News)

संजय राऊत मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते. त्यावेळी ते म्हणाले, शिवसेना एक कडवट मावळा राज्यसभेत पाठवणार आहे. मावळे असतात म्हणून राजे असतात असेही ते म्हणाले. राज्यसभेच्या सहाव्या जागेचा विषय आता संपला आहे, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेना आता संभाजीराजे यांच्या ऐवजी संजय पवार यांना उमेदवारी देणार असल्याचे फायनल झाले आहे. त्यामुळे संजय राऊत आणि संजय पवार हे शिवसेनेच्या वतीने राज्यसभेत असणार आहेत.

संभाजीराजेंचा आम्ही आदर करतो, म्हणूनच त्यांना पक्ष प्रवेशासाठी निमंत्रण दिले होते. या आधी शाहू महाराजांनी शिवसेनेच्या तिकीटावर लोकसभा निवडणूक लढवली आहे. मालोजीराजेंनी काँग्रेसमधून आणि स्वत: संभाजीराजेंनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लोकसभा निवडणूक लढवली आहे. त्यामुळे छत्रपतींना कोणत्याही पक्षाचे वावडे नसावे, असेही राऊत म्हणाले.

संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या प्रस्तावाला प्रतिसाद न दिल्याने अखेर शिवसेनेने आपला उमेदवार निश्चित केला आहे. सुरूवातीला ज्येष्ठ नेत्यांना या जागेवर संधी दिली जाईल, अशी चर्चा होती. पण कोल्हापूरातीलच संजय पवार हे नाव अचानक चर्चेत आले होते.

संजय पवार हे कोल्हापूरचे जिल्हा प्रमुख आहेत. कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित असलेले पवार हे मागील 25 ते 30 वर्षांपासून पक्षात सक्रीय आहेत. एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांकडे पाहिले जाते. कोल्हापूर महापालिकेत ते नगरसेवकही होते. सीमाप्रश्नी त्यांनी अनेकदा आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच ते कोल्हापूरातीलच असल्याने शिवसेनेने त्यांच्या नावाला पसंती दिल्याचे समजते. मराठा उमेदवार देऊन शिवसेनेने समाजाची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT