Shiv Sena MNS alliance : राज्यात ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चा सुरू आहेत. ठाकरे बंधू देखील थेट बातमी देण्याच्या तयारीत आहे. दोघे बंधू सूचक बोलत असले, तरी प्रत्यक्षात जाहीरपणे त्यावर भाष्य करणं टाळत आहे.
मात्र दोघा बंधूंचे मुलं उद्धव ठाकरेंचे चिरंजीव आमदार आदित्य ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यावर या युतीवर सूचक असं वक्तव्य करत आहे. आमदार आदित्य ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर पहिली प्रतिक्रिया दिली.
आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी ठाकरे बंधू यांच्या युतीवर शिवसेना ही चळवळ पहिल्यापासून महाराष्ट्र आणि मराठी माणसांसाठी बांधिल आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसाच्या हितासाठी काम करत असलेल्या असलेल्या आणि तयारी असलेल्या कोणत्याही व्यक्ती आणि पक्षासोबत, आम्ही काम करण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया दिली.
'बदल घडवून आणण्याची आमची जबाबदारी आहे. महाराष्ट्राच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही पक्षाने एकत्र येऊन लढले पाहिजे', असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले. आदित्य ठाकरे यांची ठाकरे बंधूंच्या युतीवर पहिलीच प्रतिक्रिया दिल्याने ती चर्चेत आली आहे.
नवी मुंबई (Mumbai) दौऱ्यावर असताना मनसचे अमित ठाकरे यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलणे टाळले होते. परंतु कार्यकर्त्यांबरोबर अनौपचारिक गप्पांमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चांवर दुजोरा दिला. मुंबई , नवी मुंबई , ठाणे आदी शहराचा दौरा करत मनसेची संघटनात्मक बांधणी करणार असल्याचेही संकेत अमित ठाकरे यांनी दिले.
ठाकरे बंधूंच्या युतीबाबत उद्धव अन् राज ठाकरेंमध्ये थेट चर्चा झालेली नाही. नातेवाईकांच्या माध्यमातून दोन्ही बंधूंच्या युतीची चर्चा सुरू आहे. मात्र जाहीरपणे ठाकरे बंधूंनी युतीबाबत बोललेले नाही. घोषणा केलेली नाही. मात्र ठाकरेंच्या युतींच्या चर्चांचा अनेकांनी धसका घेतला आहे. महायुतीकडून या ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांवर लक्ष ठेवलं जात आहे.
महायुतीकडून ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगितलं जात असलं, तरी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी या युतीमुळे राजकीय समीकरणं बदलतील, असे भाकीत वर्तवलं आहे. त्यामुळे युतीबाबत आणि त्यानंतर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.