Eknath Shinde Sarkarnama
मुंबई

Eknath Shinde Maharashtra DCM : मी, एकनाथ संभाजी शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून..; अन् सस्पेन्स संपला! ...पाहा VIDEO

ShivSena chief Eknath Shinde oath deputy chief minister Mahayuti government : एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये सहभागी होतील की नाही, यावर शेवटपर्यंत सस्पेन्स होता. तो एकनाथ शिंदे यांच्या शपथे घेतल्यानंतर थांबला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : महायुतीत नाराज असलेले शिवसेनेचे एकनाथ शिंदे सरकारमध्ये सहभागी होतील की नाही, हा सस्पेन्स शपथविधीपर्यंत होता. हा सस्पेन्स शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार एकत्र शेजारी-शेजारी बसलेले असताना, एकनाथ शिंदे मात्र दोघांपासून दूर बसल्याने तो अधिक वाढला. त्यामुळे एकनाथ शिंदे सत्तेत सहभागी होणार नाही, अशी चर्चा अधिकच बळावली.

परंतु देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांचे उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथसाठी नाव पुकराले. याचबरोबर महायुती सत्तेतील शिवसेनेच्या सहभागचा ताणलेल्या सस्पेन्सला पूर्णविराम मिळाला.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना हिंदूहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादांची आठवण केली. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या पाठिंबा असल्याचे सांगत शपथ घेऊन, सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

अडीच वर्षापूर्वी महायुतीमध्ये झालेला घटनाक्रम पुन्हा आताच्या शपथविधीत झाला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. आता फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची अन् शिंदेंनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. असा शपथ होण्याचा इतिहास देखील महाराष्ट्रात पहिल्यांदा झाला आहे.

खातेवाटपानंतर समजले गृहमंत्रीपद कोणाकडे?

महायुती सरकारमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार व्हायचा आहे. महायुतीत सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्यानंतर मुख्यमंत्रीपद भाजपकडे हे निश्चित झाले. त्यानंतर शिवसेनेकडून महायुतीत उपमुख्यमंत्री पदाबरोबरच, गृहमंत्री पदावर दावा सांगण्यात सुरवात केली. हा पेच सुटला की नाही, त्याचा अजून उलगडा झालेला नाही. खातेवाटपानंतर खरं काय हे समोर येईल.

फडणवीस-शिंदे यांची भेट, अनेक प्रश्न अनुत्तरीत...

एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदासाठी भाजप महायुतीवर पुरता दबाव बनवण्याचा प्रयत्न केला. दिल्ली दौऱ्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे आठवडाभर भेटले नव्हते. एकनाथ शिंदे गावी निघून गेले. तिथं आजारी पडले. त्यानंतर मुंबईला आले. तरी भाजपच्या नेत्यांना भेटले नाही. आजारातून सावरल्यानंतर त्यांनी मंत्रालयात भेट लावून कामला सुरवात केली. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे एकनाथ शिंदे यांच्या घरी गेले आणि त्यांची भेट घेतली.

फडणवीस, पवार यांच्यापासून शिंदे का बसले होते दूर...

दरम्यानच्या काळात गिरीश महाजन यांनी देखील एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे नाराज नसल्याचे सांगितले. परंतु शपथविधीपर्यंत एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या, उपमुख्यमंत्रिपदावर शपथ न घेण्याचे वृत्त होते. त्यातच शपथविधी सोहळ्याच्या व्यासपीठावर देखील एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यापासून दूर बसले होते. त्यामुळे शिंदे सत्तेत सहभागी होणार नसल्याच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले. परंतु शिंदे यांचे नाव उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथेसाठी पुकारल्यानंतर या सर्व चर्चांना विराम मिळाला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT