Shivsena to contest Zilla Bank elections; Interested people start work: Shambhuraj Desai's suggestionShivsena to contest Zilla Bank elections; Interested people start work: Shambhuraj Desai's suggestion
Shivsena to contest Zilla Bank elections; Interested people start work: Shambhuraj Desai's suggestionShivsena to contest Zilla Bank elections; Interested people start work: Shambhuraj Desai's suggestion 
मुंबई

शिवसेना जिल्हा बँक लढणार; इच्छुकांनी कामाला लागा : शंभूराज देसाईंची सूचना

सरकारनामा ब्यूरो

सातारा : शिवसेनेच्या वतीने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक लढवली जाणार आहे. त्यासाठी इच्छुकांनी कामाला लागावे, अशी सूचना गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. दरम्यान, काँग्रेससह इतर समविचारी लोकांची भूमिका लक्षात घेऊन शिवसेनेचे नेते आगामी रणनिती ठरविणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीकडून शिवसेनेच्या या निर्णयाकडे कसे बघितले जाणार याची उत्सुकता आहे. Shivsena to contest Zilla Bank elections; Interested people start work: Shambhuraj Desai's suggestion

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली सातारा शासकिय विश्रामगृहात झाली. यावेळी शिवसेनेचे उपनेते जिल्हा संपर्क प्रमुख प्रा. नितीन बानुगडे पाटील, कोरेगावचे आमदार महेश शिंदे, कराड उत्तर विधानसभेचे उमेदवार धर्यशील कदम, माण-खटावचे युवा नेते शेखर गोरे, महाबळेश्वरचे नेते डी. एम. बावळेकर आदी उपस्थित होते. 

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज बैठकीत चर्चा झाली. यामध्ये बँकेच्या मतदारसंघनिहाय चर्चा करून संपूर्ण आढावा घेण्यात आला. या बँकेची कच्ची कच्ची मतदार यादी येत्या शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे.  या पार्श्वभूमीवर मतदारसंघ, उमेदवार यासंदर्भात सखोल चर्चा करण्यात आली. 

बँकेच्या मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात असलेल्या शिवसेनेच्या इच्छुक नेत्यांनी  कामाला लागावे, अशी सूचना यावेळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. सद्यस्थितीत व काँग्रेस व इतर समविचारी पक्षांच्या लोकांची भूमिका लक्षात घेऊन शिवसेनेचे नेते आपली आगामी रणनिती ठरवणार आहेत. लवकरच निवडणुकीचा ठोस आराखडा तयार करून मुंबईमध्ये वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक आयोजित केली जाणार आहे. 

या बैठकीतून पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व मार्गदर्शनाखाली शिवसेना पक्षाची जिल्हा बँकेच्या निवडणुकीसंदर्भातील भूमिका व किती जागा लढवणार संदर्भातील घोषणा केली जाणार आहे. शिवसेनेने जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते काय भूमिका घेणार हा प्रश्न आहे. राष्ट्रवादीने महाविकास आघाडीतील घटकपक्ष म्हणून शिवसेनेला विचारात घेतले नाही. तर शिवसेना काँग्रेससोबत इतर सर्व समविचारी पक्षांना एकत्र करून जिल्हा बँकेत पॅनेल टाकण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT