Nitin Deshmukh
Nitin Deshmukh sarkarnama
मुंबई

मावळ्यांनो, परत या ! ; शिंदेंच्या तावडीतून सुटलेल्या आमदाराची विनंती

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेच्या (shivsena) बंडखोर गटांच्या ताब्यातून सुटलेल्या दोन आमदारांनी आज माध्यमांसमोर त्यांच्यावर आलेल्या संकटाची माहिती दिली. "आम्हाला फसवून नेले होते," असे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटातून आपली सुटका केलेल्या या दोन आमदारांनी सांगितले. (mla Nitin Deshmukh news update)

"शिंदेच्या गटातील अनेक आमदारांची परत येण्याची इच्छा आहे, पण त्यांना डांबून ठेवण्यात आले आहे," असा आरोप यावेळी आमदार नितीन देशमुख यांनी केला. "मावळ्यांनो, परत या!" अशा शब्दात देशमुखांनी गुवाहाटीतील आमदारांनी विनंती केली.

आमदार कैलास पाटील, आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी आपल्या अपहरण आणि सुटकेची कहानी यावेळी सांगितली. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यावेळी उपस्थित होते. राऊतांनी शिंदे गटातील आमदारांनी २४ तासात परत मुंबईत या, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करा, तुमच्या मागणीचा विचार केला जाईल,"असे सांगितले.

कैलास पाटील म्हणाले, "विधान परिषद निवडणूक संपल्यानंतर माझ्यासह काही आमदारांना एका गाडीत बसवण्यात आलं. 'एकनाथ शिंदे भेटणार आहेत, चर्चा करणार आहेत,' असं सांगत नेण्यात आलं आणि प्रवास सुरू झाला. दोन ते तीन तास झाले तरी शिंदे यांच्याशी काही भेट झाली नाही मला शंका आली. गाडीत बसवून आपल्याला नेमकं कुठे घेऊन चालले आहेत ? असा प्रश्न पडला होता. तोपर्यंत गाडी गुजरात सीमेजवळ पोहचली होती. आपली दिशाभूल झालीय, हे मला कळून चुकलं होतं. "गाडी थांबवा," असं मी ड्रायव्हरला सांगितलं. गाडीतून खाली उतरताच अंधाराचा फायदा घेत मी येथून निसटून गेलो. महाराष्ट्र सीमेवरून त्यांनी भर पावसात 4-5 किलोमीटर पायी प्रवास केला. पुढे एका मोटार सायकलवर लिफ्ट मिळाली. पुढे मी महाराष्ट्रात आलो,"

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड करून शिवसेना आमदारांच्या एका गटासह सूरत गाठलं होते. यामध्ये शिवसेनेचे बाळापूरचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांचाही सामावेश होता. नितीन देखमुख गुवाहाटीवरून काल अमरावतीमध्ये परतले. त्यांनी आज माध्यमांना या घटनेची माहिती दिली.

देशमुख म्हणाले, "शिवसेनेत झालेल्या बंडखोरीमागे एकनाथ शिंदे नसून हे भाजपचे षडयंत्र आहे. शिवसेना हा निष्ठेला जागणार पक्ष आहे. या बंडामागे भाजपच सुत्रधार आहे. शिंदे गटात असलेल्या अनेक आमदारांची परत येण्याची इच्छा आहे. पण त्यांना डांबून ठेवलं आहे. शिंदे नव्हे भाजपचं मुख्य सुत्रधार आहे," यावेळी देशमुख यांनी आपल्या सुटकेविषयी सविस्तर माहिती दिली. शिंदे गटात असलेल्या आमदारांना देशमुख यांनी विनंती केली.

" मावळ्यांनो, कोणत्याही आमिषाला बळी न पडता परत या, तुम्हाला निवडून आणण्यासाठी ज्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं त्यांच्या विचार करा," असे देशमुख म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT