Mumbai : दसऱ्याच्या दिवशी राज्यभरातून लाखो शिवसैनिक शिवाजी पार्कवर येतात. एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत फूट पाडल्यानंतर गेल्या वर्षी दोन्ही गटांनी (ठाकरे गट-शिंदे गट) मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मिळाले, यासाठी महापालिकेकडे अर्ज केला होता. हा वाद न्यायालयात गेला. मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान मिळाले, यासाठी यंदा ठाकरे गटाने साधव भूमिका घेत महिनाभरापूर्वीच मुंबई महापालिकेकडे अर्ज केला आहे. या वेळीदेखील आम्हालाच मैदान मिळेल, असा विश्वास ठाकरे गटाला आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर (Shivaji Park)पहिला दसरा मेळावा (Shivsena Dasara Melava) घेतला होता, तेव्हापासून शिवाजी पार्क आणि शिवसेनेचं अतूट नातं आहे. गेल्या वर्षी दसरा मेळाव्यावरून वाद पेटला होता. याबाबत शिवसेनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायमूर्ती आर. डी. धानुका आणि न्यायमूर्ती कमल काथा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. शिंदे गटातील आमदार सदा सरवणकर यांची हस्तक्षेप याचिका न्यायालयाने फेटाळून ठाकरे गटाला शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास परवानगी दिली होती.
शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी दोन्ही गटांकडून महापालिकेला अर्ज करण्यात आला होता, महापालिकेने ठाकरे गट-शिंदे गट यांना शिवाजी पार्कवर मेळावा घेण्यास नकार दिला होता. याबाबतचे पत्र महापालिकेने दोन्ही गटाला दिले आहे. महापालिकेने कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत दोन्ही पक्षांना परवानगी नाकारली होती. त्यानंतर हे प्रकरण न्यायालयात गेले होते.
"शिवाजी पार्क या शांतता झोन आहे, हे खेळासाठीचे मैदान आहे. दोन्ही गटाला मैदान मिळविण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद मुंबई महापालिकेने केला होता. आलेल्या अर्जावर मैदान न देण्याचा निर्णय आम्ही घेतला, असे महापालिकेच्या वकिलांनी सांगितले होते. दोन्हीही गटाला अर्ज करण्याचा अधिकार नाही. मैदानाची परवानगी नाकारल्याने कुणाच्याही अधिकाराचं उल्लंघन केलेलं नाही, असे त्यांनी न्यायालयात सांगितले होते.
दसरा मेळावा आणि शिवाजी पार्क याबाबतची सुनावणी झाली "पालिकेचा निर्णय तथ्यात्मक आणि प्रमाणित नाही. मुंबई पालिकेचा वस्तुस्थितीची जाणीव आहे. कायदा-सुव्यवस्थेचे कारण देऊन पालिका अर्ज फेटाळू शकत नाही," असे निरीक्षण न्यायालयानं नोदवलं होते. शिंदें गटाची याचिका फेटाळली होती.
Edited By : Mangesh Mahale
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.