Eknath Shinde | Shivsena | Uddhav Thackeray Latest News Sarkarnama
मुंबई

सेना विरुद्ध शिंदे गट : विधानसभेतील पहिला सामना रंगणार, सेनेकडून व्हीप जारी...

विधानसभा अध्यक्षपदासाठी (Maharashtra Assembly) रविवारी निवडणूक

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) विरुद्ध शिवसेना यांच्यातील विधानभवनातील पहिला सामना हा रविवारी (ता. 3 जुलै) रोजी लढला जाणार आहे. विधानसभा अध्यक्षपदासाठी (Assembly speaker election) उद्या दुपारी बारा वाजता निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना व्हीप जारी केला आहे.

व्हीप याचा अर्थ पक्षाचा आदेश. या आदेशाला कायदेशीरदृष्ट्या महत्व असते. हा व्हीप नेहमी लाल-गुलाबी रंगात काढतात. शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांच्या स्वाक्षरीने तो जारी करण्यात आला आहे. शिवसेनेने विधानसभा अध्यक्षपदासाठी राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. साळवी यांनाच मतदान करावे, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे. बंडखोर गटाने अद्याप आपला आदेश जारी केलेला नाही.

शिवसेनेच्या बैठकीला उपस्थित न राहिल्याबद्दल बंडखोर आमदारांपैकी सोळांना नोटीस बजाविण्यात आली आहे. विधानसभा बाहेरील कृत्यासाठी व्हीप लागू होतो का, असा कायदेशीर प्रश्न त्यावर उपस्थित झाला. तसेच हा व्हिप लागू केला तेव्हा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे शिवसेनेने या सोळा आमदारांना अपात्र ठरविण्यासाठी अर्ज केला होता. त्याच वेळी दुसरीकडे झिरवळ यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल असल्याचा बंडखोरांचा दावा होता. त्यामुळे या व्हिपची लढाई सर्वोच्च न्यायालायता पोहोचली.

shivsena whip

आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निमित्ताने सभागृहातील कामकाजासाठीचा व्हीप लागू झाला आहे. त्यामुळे बंडखोर गट काय करणार, याची उत्सुकता आहे. सुनील प्रभू यांचा व्हीप जर दोन तृतीयांशपेक्षा जास्त सदस्यांनी नाकारला तर ती वैध फूट ठरू शकते. शिंदे यांच्या म्हणण्यानुसार तेवढे संख्याबळ त्यांच्याकडे आहे. दुसरीकडे आपणच शिवसेना असल्याचा दावा बंडखोरांच्या गटाने केला आहे. त्यामुळे त्यांचे प्रतोद भरत गोगावले यांनी जारी केलेला व्हीप हा शिवसेनेच्या इतर सदस्यांना लागू राहील, असे त्या गटाचे प्रवक्ते दीपक क्षीरसागर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

भाजपकडून राहुल नार्वेकर हे अध्यक्षपदाच्या रिंगणात आहेत. त्यामुळे नार्वेकर विरुद्ध साळवी ही लढत राज्याच्या राजकारणात रंगतदार ठरणा आहे आणि त्यातून भविष्यातील राजकारणाचे वळणे कळणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT