Ranjitsinha Deshmukh 
मुंबई

रणजितसिंह देशमुख स्वगृही परतणार; आज मुंबईत काँग्रेस प्रवेश 

काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची गळ घातली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांची पहिल्यापासून जवळीक आहे. जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आग्रह धरून रणजितसिंह देशमुख यांना काँग्रेस पक्षात सक्रिय करण्याची विनंती केली. पृथ्वीराज बाबांशी झालेल्या समक्ष भेटीनंतर रणजितसिंह देशमुख यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला आहे.

शशिकांत धुमाळ

निमसोड : माण- खटावचे युवा नेते रणजितसिंह देशमुख शिवसेना सोडून पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मुंबईतील गांधी भवनात  उद्या (बुधवारी) प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांचा प्रवेश होणार आहे. 

 यापूर्वी रणजितसिंह देशमुख सातारा जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष होते. २००७ मध्ये जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर विकासकामे करत काँग्रेस पक्षाची पाळुमुळे त्यांनी घट्ट केली. पाणी परिषदा, संघर्ष पदयात्रा, जनजागृती अभियानाद्वारे दुष्काळी भागासाठी सिंचन योजना कार्यान्वित होण्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा केला.

कृष्णा खोरे कार्यालयावर जनआंदोलन उभारून उरमोडी व जिहे कठापूर या  सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली. दुष्काळी भागात सहकारी उद्योगांची यशस्वीपणे उभारणी करणारे पहिले, औद्योगिक क्रांतीचे ते आयडॉल नेते ठरले. सहकारी सुतगिरणी व्यवसायाला नवी दिशा
देण्याचे काम त्यांनी केले.

फिनिक्स ऑर्गनायझेशन या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून माण-खटाव या दुष्काळी तालुक्यातील अनेक गावात पाणलोट क्षेत्र विकासाचे काम करत जलसंधारणाची कामे पूर्ण करून वृक्ष लागवड कार्यक्रमही राबविला. तसेच महिला व युवकांना स्वंयम रोजगार प्रशिक्षण, स्वंयम सहाय्यता गटांची
निर्मिती आणि व्यवसाय मार्गदर्शन शिबीरे आदी उपक्रम सुरू केले आहेत.

दोन सुतगिरणीच्या यशस्वीतेनंतर शुगर ग्रीड साखर कारखाना पिंगळी (ता. माण) येथे १० मेगावॅट विज प्रकल्प व ४० केएलपीडी डिस्टलरी या उपपदार्थ निर्मितीसह कारखाना उभारण्यास प्रारंभ केला आहे. एक वर्षात काम पूर्ण होऊन प्रत्यक्ष गळीत हंगाम सुरू होईल. मध्यंतरीच्या काळात काँग्रेसमधील अंतर्गत कलहातून त्यांनी पक्षातून बाहेर पडून शिवसेनेमध्ये प्रवेश केला होता.

तद्‌नंतर आपल्या राजकीय हितसंबधांचा उपयोग करून देशमुख यांनी दुष्काळी परिस्थितीत दोन्ही तालुक्यात सुमारे ७० चारा छावण्या सुरू करून दुष्काळग्रस्तांना दिलासा दिला होता. सिंचन योजनेद्वारे कातरखटाव परिसरात शेती पाणी व पिण्याच्या पाण्याचा जटील प्रश्न मार्गी लावला. परंतू काँग्रेस विचारधारेचा पगडा असलेले रणजितसिंह देशमुख शिवसेनेत फारसे
रमले नाहीत.

२०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीत झालेल्या राजकीय उलथा- पालथी मध्ये त्यांनी  'आमचं ठरलय' या सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी स्वतंत्रपणे उभा
केलेल्या उमेदवाराचा प्रचार केला होता. दरम्यान, काँग्रेसमधील काही वरिष्ठ नेत्यांनी त्यांना पुन्हा पक्षात प्रवेश करण्याची गळ घातली. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी त्यांची पहिल्यापासून जवळीक आहे. 

जिल्ह्यातील काँग्रेसमध्ये सक्रिय असलेल्या त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे आग्रह धरून रणजितसिंह देशमुख यांना काँग्रेस पक्षात सक्रिय करण्याची विनंती केली. पृथ्वीराज बाबांशी झालेल्या समक्ष भेटीनंतर रणजितसिंह देशमुख यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित झाला.

उद्या (बुधवारी) सकाळी ११ वाजता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत. सातारा जिल्ह्यात ज्येष्ठ नेते विलासराव पाटील उंडाळकर व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटात मनोमिलन झाले. त्यानंतर आता रणजितसिंह देशमुख काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याने माण- खटाव विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाची ताकद वाढणार आहे. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT