मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपचे (BJP) नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांच्यासह इतर नेत्यांना लक्ष्य केले आहे. यावरून शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद पुन्हा पेटला आहे. आज राऊत आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची भेट घेतली. या भेटीत त्यांच्यात काही काळ चर्चा झाली. या भेटीनंतर राऊत सूचक वक्तव्य करीत या प्रकरणी मोठ्या घडामोडीचे संकेत दिले आहेत.
या भेटीनंतर संजय राऊत म्हणाले की, किरीट सोमय्याच्या आरोपांबाबतची फाईल मुख्यमत्र्यांकडे आहे. आम्ही कागदपत्रांबाबत पक्के आणि ठाम आहोत. मुख्यमंत्र्यांना आजच भेटलो असे नाही. मी सतत त्यांना भेटत असतो. एखादा नेता पक्ष प्रमुखाला भेटतो म्हणजे नेमके काय होत तर राजकीय चर्चा होत असतात. राज्यातील घडामोडींबाबत चर्चा होते. मुख्यमंत्र्यांना मी सतत भेटत आहे याचा अर्थ असा आहे की वेट अँड वॉच!
खासदार राऊत यांनी नुकताच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सोमय्यांवर हल्लाबोल केला होता. ते म्हणाले होते की, निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनी कुणाची आहे? ही कंपनी किरीट सोमय्या, त्यांचे कुटुंबीय आणि त्यांचा मुलगा नील यांची आहे. त्यांचा भागीदार पीएमसी बँक गैरव्यवहारातील आरोपी राकेश वाधवा आहे. पीएमसी गैरव्यवहारातील पैशाची गुंतवणूक त्याने केली. यातून वसई तालुक्यातील गोखीवरे येथे हजारो कोटींचा प्रकल्प उभारण्यात आला. पीएमसी बँक गैरव्यवहार प्रकरणी सोमय्यांनी ब्लॅकमेल करून कोट्यवधीची जमीन घेतली. देवेंद्र लधाणी या फ्रंटमनच्या नावावर ही जमीन घेण्यात आली आणि पैसेही घेण्यात आली. चारशे कोटींची जमीन फक्त साडेचार कोटींना घेण्यात आली. एकूण दोन जमिनी घेण्यात आल्या.दुसरी जमीन सात कोटींनी घेण्यात आली.
सोमय्या कुुटुंबीयांचा विनापरवानगी प्रकल्प
या जमिनीवर जो प्रकल्प उभा आहे, त्या कंपनीचा संचालक नील सोमय्या आहे. निकॉन फेज 1 फेज 2 हे हजारो कोटींचे प्रकल्प उभारले आहेत. हा सगळा पैसा पीएमसी बँकेतील आहे. या प्रकल्पाला पर्यावरण विभागाची मंजुरी नाही. हरित लवादाने यात लक्ष घातल्यास दोनशे कोटींचा दंड होऊ शकतो. यात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ताबडतोब लक्ष घालावे, असे माझे आवाहन आहे. सगळ्या प्रकल्पाचे परवाने रद्द करावेत. पीएमसी गैरव्यवहाराचा तपास करणाऱ्या आर्थिक गुन्हे शाखेने किरीट अन् नील सोमय्याला ताबडतोब अटक करावी, असेही राऊत यांनी सांगितले होते.
पीएमसी गैरव्यवहाराची सोमय्यांना आधीच माहिती
पीएमसी गैरव्यवहार आधीच माहिती सोमय्याच्या जवळच्या लोकांनी आधीच पैसे काढून घेतले. हा सोमय्या भाजपचा मुंबईतील चेहरा आहे. तो आता भ्रष्टाचारा विरोधात लढाई लढत आहे. पत्रा चाळीतले पैसेही सोमय्यांच्या कंपनीत गेले. याची सगळी चौकशी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी करावी. हे सगळे मी पाच टक्के सांगितले आहे. बाकीचे पेपर मी ईडीकडे पाठवले आहेत. सोमय्यांचे भ्रष्टाचाराचे सगळे कागद मी तीन वेळा ईडीला पाठवले आहेत, असेही राऊतांनी स्पष्ट केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.