Eknath Shinde, Devendra Fadnavis and Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

MLA Disqualification Case: हालचालींना वेग; आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाआधी मंत्रिमंडळाची तातडीची बैठक

Shivsena MLA Disqualification News : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाचा आज फैसला; कोण पात्र ? कोण अपात्र ? निर्णयाकडे राज्याचे लक्ष

Ganesh Thombare

Mumbai News: शिवसेना आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील अंतिम निकाल बुधवारी दुपारी 4 वाजता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर देणार आहेत. शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाला काही तास शिल्लक राहिले असतानाच राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या निकालाआधीच आज सकाळी दहा वाजता मंत्रिमंडळाची तातडीची बैठक बोलवण्यात आली आहे.

या निकालाच्या पूर्वसंध्येलाच म्हणजे मंगळवारी संध्याकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पोलिस महासंचालकही उपस्थित होते. त्यामुळे निकालाआधीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आल्याची चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार अपात्रतेच्या प्रकरणावरील निकालानंतर राज्यात कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये, याबरोबरच मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे, यासह आदी प्रश्नासंदर्भात या बैठकीत चर्चा तसेच काही महत्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या बैठकीकडेही राज्याचे लक्ष लागले आहे.

निकालाला काही तास शिल्लक...

दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाला काही तास शिल्लक राहिले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आज सांयकाळी 4 वाजता अंतिम निर्णय देणार आहेत. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. तीन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली होती. यावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला होता. तसेच याबाबत सुप्रीम कोर्टात अर्जही दाखल केला आहे. त्यामुळे आता अपात्रता प्रकरणाचा निकाल काय येतो, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT