Sanjay Raut Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi Meeting: महाविकास आघाडीच्या बैठकीत काय ठरलं ? संजय राऊतांनी सांगितलं...

Ganesh Thombare

Mumbai News: आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची शुक्रवारी मुंबईत महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर देखील सहभागी झाले होते. या बैठकीत महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला नेमकं कसा असेल ?, भाजपला रोखण्यासाठी रणनीती काय असावी, यावर चर्चा झाली. 'भाजपचा पराभव हीच आमची प्राथमिकता, त्यानंतर जागावाटप', असं संजय राऊतांनी सांगितलं आहे. (Mahavikas Aghadi Meeting)

महाविकास आघाडीच्या मागील बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी 'कॉमन मिनिमम प्रोग्राम'वर बैठकीत चर्चा व्हावी, अशी मागणी केली होती. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत 'कॉमन मिनिमम प्रोग्राम'वर चर्चा झाली असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

राऊत म्हणाले, 'प्रकाश आंबेडकर हे आजच्या बैठकीत सामील झाले होते. आमची पुढची दिशा ठरली असून आज सकारात्मक चर्चा झाली. भाजपला प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत होईल, असं काहीही करायचं नाही. देशातील वातावरण बदलण्सासाठी एकत्र राहणार आहोत. भाजपचा पराभव हीच आमची प्राथमिकता असून त्यानंतर जागावाटप, असं राऊत म्हणाले.

'कॉमन मिनिमम प्रोग्राम'साठी वेगळी समिती

महाविकास आघाडीतील पक्षांमध्ये 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरवण्यात यावा, अशी मागणी आंबेडकर यांनी केली होती. त्यानंतर आज झालेल्या बैठकीत 'कॉमन मिनिमम प्रोग्राम'वर सविस्तर चर्चा करण्यात आली. आता महाविकास आघाडीत 'कॉमन मिनिमम प्रोग्राम'साठी वेगळी समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे राऊतांनी सांगितले.

बैठकीनंतर आंबेडकर काय म्हणाले ?

'मी (वंचित बहुजन आघाडी) महाविकास आघाडीसोबत नाही. फक्त राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आहे. काँग्रेससोबत सध्या चर्चा सुरु आहे', असे आंबेडकरांनी सांगितले. तसेच काही मुद्यांवर आज चर्चा झाली, तर अजून काही मुद्यांवर लवकरच चर्चा होणार आहे. एकदा 'कॉमन मिनिमम प्रोग्राम' ठरला की जागावाटपावर चर्चा करणार आहोत, असंही प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

(Edited By-Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT