NCP Mahesh Tapase Latest News  sarkarnama
मुंबई

बंडखोरांनी शिवसेना फोडली अन् खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर...

Mahesh TRapase|Shivsena|NCP : बंडखोर नेत्यांच्या टीकेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

सरकारनामा ब्यूरो

Mahesh Tapase : बंडखोर आमदारांनी शिवसेना (Shivsena) फोडली..'मातोश्री'ला दगाफटका केला..ठाकरे कुटुंबाचा विश्वासघात केला आणि स्वतःच्या कृतीला योग्य आहे हे दाखविण्यासाठी त्याचे खापर राष्ट्रवादीच्या माथ्यावर मारण्याचा हा केविलवाणा प्रयत्न रामदास कदम (Ramdas Kadam) व काही बंडखोर नेत्यांचा असल्याचे जोरदार प्रत्युत्तर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी दिले आहे.

तपासे म्हणाले, २०१९ मध्ये पवारसाहेबांनी राष्ट्रवादी-शिवसेना-कॉंग्रेस या तीन पक्षांची मोट बांधली आणि उध्दव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले. त्यांनी मुख्यमंत्री म्हणून चांगला कारभार केल्यामुळेच देशाच्या पाच टॉप मुख्यमंत्र्यांच्या यादीत त्यांच नाव आले आहे. त्यामुळे ठाकरे यांना सोडून जात असताना राष्ट्रवादी काँग्रेस ठाकरे यांच्याच पाठीमागे खंबीरपणे उभी आहे, असेही तपासे म्हणाले.

शिंदे गटाने शिवसेना फोडली याचे खरे सूत्रधार हे भाजप असून २०१९ मधील जो राग आहे त्यातून हे षडयंत्र सुरू आहे. पोलीस बळ आणि केंद्रीय यंत्रणांचा वापर करत आमदार, खासदार यांना भयभीत केले गेले आणि यामध्ये ठाकरे कसे चुकले हे दाखवण्याचा प्रयत्न आहे. मात्र राज्यातील जनता व शिवसैनिक ज्यांना निवडून दिले त्यांनी 'मातोश्री'शी कशी गद्दारी केली हे पहात आहे अशा शब्दात त्यांनी भाजपला सुनावले.

आज शिवसेना फोडून शिंदे आपली शिवसेना खरी आहे हे सांगत आहेत मग इतकी वर्षे मातोश्री अन् स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मेहनत..उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची शिवसेना वाढीची मेहनत काहीच नाही का? असा सवालही तपासेंनी केला.

शिवसेना बंडखोर आमदारांनी जी कृती केली ती महाराष्ट्रातील जनतेच्या पचनी पडलेली नाही. उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी निष्ठावान सामान्य शिवसैनिक असल्याने त्यांच्यावर डायरेक्ट टिका न करता राष्ट्रवादीवर तोंडसुख घेण्याचे काम बंडखोर शिंदे गट करत आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत, लोकसभा, विधानसभा यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित प्रचार करेल व बंडखोरांना व रिमोट कंट्रोल चालवणार्‍या भाजपचा पराभव होईल ही भीतीही निर्माण झाली असल्याचे तपासे म्हणाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT