मुंबई : एकनाथ शिंदे गटातील आमदार संदीपान भुमरे यांनी शिवसेनेचे (shivsena ) खासदार संजय राऊत (sanjay raut) यांच्यावर टीका केली. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. "संजय राऊतांचा तोल गेला आहे, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका, त्यांची दखल घेण्याची गरज नाही, असे भुमरे (sandipanrao bhumre) म्हणाले. संजय राऊत यांच्यासमोर मी लोटांगण कशाला घालू? असे संदीपान भुमरे म्हणाले. (sandipanrao bhumre latest news)
शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा नुकताच पैठणचे दौरा झाला. याबाबत भुमरेंना विचारले असता ते म्हणाले, "हा काही झंझावात नव्हता. हा काही झंझावात नाही, एका बसस्टॅंडवर ही रॅली होती, आदित्य ठाकरे काय बोलणार हे बघण्यासाठी,ऐकण्यासाठी लोक आले होते. हे सर्व जण बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचे आहेत. ते सर्व आमच्या सोबत आहेत. शिंदेंचा दौरा सुरु होईल. तेव्हा समजेल झंझावात काय असतो,"
"मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा सुरु होणार आहे. तेव्हा लक्षात येईल की आदित्य ठाकरेंना दौऱ्याला किती लोक होते आणि शिंदे साहेबांच्या सभेला किती लोक आहेत, हे लवकरच समजेल," असे भुमरे म्हणाले.
"संजय राऊत रोज काही तरी बोलत असतात. ते खालच्या पातळीवर टीका करीत आहेत, ते म्हणाले संदीपान भुमरेंना वडापाव खाता येत नाही, मी चटणी भाकर खाऊन आमदार झालो आहे.आम्ही वडापाववाले नाही, आम्ही चटणी-भाकर खाणारे कार्यकर्ते आहोत. राऊत काय बोलतील हे काही सांगता येत नाही," असे भुमरेंनी स्पष्ट केलं.
"सध्या राऊतांचा तोल गेलेला आहे, ते कुणाविषयी काय बोलतील, याचा काही नेम नाही, ते सांगतात भुमरेंनी मंत्रीपदासाठी लोटांगण घातलं, मंत्री झाले, मी ३५ वर्ष शिवसेना वाढीसाठी प्रयत्न केला. सर्व संस्था शिवसेनेच्या ताब्यात ठेवल्या. २५ वर्षांनंतर मला मंत्रीपद मिळाले. मी काही पहिल्यांदा निवडणूक आलेलो नाही, २५ वर्ष मी आमदार राहिलो, त्यानंतर मला मंत्री केलं,"अशा शब्दात भुमरेंनी राऊतांना सुनावलं.
"निवडणूक आयोगावर आमचा विश्वास आहे, बहुमत आमच्याकडे असल्याने धनुष्यबाण आम्हालाचा मिळेल, असा विश्वास भुमरे यांनी व्यक्त केला. हे सरकार अडीच वर्ष पूर्ण क्षमतेचे चालेल," असे भुमरे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.