Sanjay Raut & Kirit Somaiya
Sanjay Raut & Kirit Somaiya Sarkarnama
मुंबई

किरीट सोमय्या ब्लॅकमेलिंग करतात ; राऊतांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

मुंबई : भाजपचे नेते किरीट सोमय्या हे शनिवारी पुणे महापालिकेत जम्बो कोरोना रुग्णालयाच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी गेले असता तेव्हा शिवसेना आणि त्यांच्यात शाब्दीक वाद झाला. या गोंधळात सोमय्यांना धक्काबुक्की झाली.

शिवसैनिकांनी त्यांच्या रस्ता अडविल्यामुळे ते महापालिकेच्या पायऱ्यावर पडले. त्यांनी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर शिवसेना (shivsena) आणि भाजपच्या (bjp) नेत्यांमध्ये जुंपली आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी 'सामना'च्या 'रोखठोक'मधून सोमय्यांवर (kirit somaiya) हल्लाबोल केला आहे.

“किरीट सोमय्या महाराष्ट्राच्या सरकारला धमक्या देतात. मुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची बदनामी करतात. महाराष्ट्राविरुद्ध कारस्थाने करतात आणि हे महान कार्य करत असल्याबद्दल भाजपाच्या केंद्र सरकारने त्यांना केंद्र सरकारची खास ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा व्यवस्था दिली आहे. मराठीचे आणि महाराष्ट्राचे शत्रू अशा पद्धतीने भाजपचे केंद्र सरकार पोसत आहे,” असा शब्दात संजय राऊतांनी भाजपला फटकारलं आहे.

''सोमय्या ईडी कार्यालयात जातात व उद्या कुणाला बोलवायचे व दम द्यायचा तो अजेंडा ठरवतात व पुन्हा ते तसे जाहीर करतात, उद्या ईडी कुणाच्या घरी पोहोचणार हे ते आधी जाहीर करतात. त्यानुसार ईडीच्या कारवाया होतात. हे घडत असल्याने मोदी व शहांच्या प्रतिमेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले,” असं संजय राऊत यांनी रोखठोकमध्ये म्हटलं आहे.

''समाजमाध्यमांवर कोणा एका ‘हिंदुस्थानी भाऊ’ने दहावीच्या विद्यार्थ्यांना भडकविले व रस्त्यावर उतरविले. या मुलांना रस्त्यावर उतरण्याची चिथावणी दिली. सध्या हे महाशय अटकेत आहेत, पण या भाऊचा भाऊसाहेब करून डोक्यावर घ्यायला सध्याचा विरोधी पक्ष कमी करणार नाही,” असा इशारा राऊतांनी दिला आहे.

“ईडी, सीबीआयच्या सूडाच्या कारवाया भाजपला विजय मिळवून देणार नाही. गोव्यात भाजप पुन्हा येत नाही व उत्तर प्रदेशात अखिलेश यादवांचा विजयरथ पुढे चालला आहे. रॉ आणि सीबीआय इंदिरा गांधींना पराभवापासून वाचवू शकले नाही तेथे आजच्या तपास यंत्रणा काय करणार? पुन्हा भाजपचे किरीट सोमय्या तर सरळसरळ ब्लॅकमेलिंग करतात,'' असा आरोप राऊतांनी सोमय्यांवर केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT