Shivsena Symbol :  Sarkarnama
मुंबई

Shivsena Symbol : शिंदे गटांचं आता 'सोशल मीडिया स्ट्राईक' : 'धनुष्यबाण' मिळताच नेत्यांनी बदलले फोटो!

Shivsena Symbol : शिंदे गटातल्या नेत्यांनी धपाधप प्रोफाईल बदलत, धनुष्यबाण लावले.

सरकारनामा ब्यूरो

Shivsena Symbol : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Politicis Crisis) केंद्रीय निवडणूक आयोगाने अखेर निकाल दिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गटाला शिवसेना हे नाव व धनुष्यबाण चिन्ह देण्यात आले आहे. उद्धव ठाकरेंना हा आयोगाचा मोठा दणका मानला जात आहे. यानंतर शिंदे समर्थकांकडून जल्लोष केला गेला. या निर्णयानंतर आता शिंदे गटाच्या नेत्यांनी सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये 'धनुष्यबाण' चिन्ह लावले आहेत.

निवडणूक आयोगाने धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देताच शिंदेनी स्वत: ट्वीटरवरील प्रोफाईल पिक्चरमध्ये बदल केला आहे. त्यांनी धनुष्यबाण व शिवसेना हे नाव प्रोफाईला लावले आहे. त्याप्रमाणे, उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, खासदार श्रीकांत शिंदे या शिंदे गटातील नेत्यांनी देखील ट्विटरवरील प्रोफाईल पिक्चरमध्ये धनुष्यबाण चिन्हाचा समावेश केला आहे.

Eknath shinde

प्रोफाईल पिक्चर धनुष्यबाण चिन्ह लावलेले नेते :

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्योगमंत्री उदय सामंत

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई

खासदार श्रीकांत शिंदे

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

कृषीमंत्री अब्दुल सत्तार

आरोग्य मंत्री तानाजी सावंत

बंदरे व खनिकर्म मंत्री दादा भुसे

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे

शिंदे गटातल्या जवळ-जवळ सगळ्याच मंत्र्यांनी व नेत्यांनी त्यांचे ट्वीटर आणि फेसबुकवरील प्रोफाईलमध्ये धनुष्यबाण चिन्हाचा समावेश केला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने काल याचा निर्णय दिला. एकनाथ शिंदे यांना शिवसेना असे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह दिलं आहे. यानंतर लगोलग शिंदे गटातल्या नेत्यांनी प्रोफाईल अपडेट करत धनुष्यबाण चिन्हाचे फोटो ठेवले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT