bodyguard beaten Car driver  sarkarnama
मुंबई

Video Shivsena UBT : आमदाराच्या बॉडीगार्डकडून बेदम मारहाण, व्हिडिओ दाखवत ठाकरे गटाचा शिंदेंवर आरोप

Shivsena UBT Mahendra Thorve Eknath Shinde : महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली, असा आरोप ठाकरे गटाने केला आहे.

Roshan More

Video Shivsena UBT : नेरळ येथे कारचालकाला त्याच्या कुटुंबाच्या समोरच बेदम मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ ठाकरे गटाने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. मारहाण करणारी व्यक्ती शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे यांचा बॉडीगार्ड शिवा असल्याचे देखील ट्विटमध्ये म्हटले आहे.

कर्जत तालुक्यातील नेरळमध्ये भररस्त्यात कारचालकाला आमदार महेंद्र थोरवेंच्या बॉडीगार्डकडून मारहाण झाली. त्या व्यक्तीची मुलं बायका रडत होती. मात्र, कोणी मदतीला आलं नाही, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

'साम टिव्ही'शी बोलताना आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, मारहाण करणारी व्यक्ती माझा बॉडीगार्ड नाही. ते दोन्ही कार्यकर्ते आमचेच आहेत. त्यांच्यात आपआपसांत वाद झाले आहे. त्यानी चुकीचे कृत्य केले असेल तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

ठाकरे गटाच्या ट्विटमध्ये काय?

'महाराष्ट्रात गुंडाराज! मिंधेंच्या आमदाराच्या, महेंद्र थोरवे ह्यांच्या 'शिवा' नावाच्या बॉडीगार्डने नेरळ येथे भर दिवसा, भर रस्त्यात एका व्यक्तीला मारहाण केली. त्या व्यक्तीची बायका मुलं रडत होती, पण कोणी मदतीला यायची हिम्मत केली नाही... कायद्याच्या चिंधड्या, लोकांचे हाल! ही फक्त कर्जतची अवस्था नाही, राज्यभरात गुंडगिरी वाढलीये! कायदा-सुव्यवस्थेची वाट लागलीये! कारण, गुंडांचा म्होरक्याच बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रीपदावर बसलाय!', असे ठाकरे गटाने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच!

कायदा सुव्यवस्था बिघडण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच जबाबदार असल्याचे देखील ठाकरे गटाने म्हटले आहे. गुंडांचा मोरक्या बेकायदेशीरपणे मुख्यमंत्रिपदावर बसलयात असा आरोप करत मिंधे राजवट फक्त गुंडांसाठीच, असा टोला देखील ठाकरे गटाने लगावला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT