Chandrakant Patil latest news
Chandrakant Patil latest news  
मुंबई

शिवसेनेकडून अपक्ष आमदारांना धमक्या; चंद्रकांत पाटील यांचा गंभीर आरोप

सरकारनामा ब्युरो

Chandrakant Patil latest news

मुंबई : राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सहा जागांसाठी काल मतदान व मतमोजणी झाली. यात सहावी जागा भाजपने जिंकत महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) धक्का दिला. राज्यसभेच्या निकाल लागताच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शिवसेनेने अपक्ष आमदारांना धमकावल्याचा गंभीर आरोप केला आहेत.

''राज्यसभा निवडणुकीपूर्वी शिवसेनेने अपक्ष आमदारांना बोलावून धमक्या दिल्याचा आरोप केला आहे. अजून अडीच वर्ष राज्यात आमचंच सरकार आहे. त्यामुळे विकास निधीसाठी आमच्याकडेच यावंच लागेल. मत दिलं नाही तर याद राखा, अशा धमक्या शिवसेनेने अपक्ष आमदारांना दिल्याचं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं. तसेच, विकासनिधी काय तुमच्या घरचा आहे का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी आपण उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशाराही दिला आहे. तसेच शिवसेनेनं अपक्ष आमदारांना कोट्यवधी रुपये देण्याचं आमिष दाखवल्याचा दावाही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालाबाबत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप ही जागा जिंकणार होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारीच्या दिवशी आम्ही महाविकास आघाडीकडे खूप आग्रह धरला. तुम्ही हा हट्ट धरू नका. 24-25 वर्षे महाराष्ट्रात राज्यसभेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. आम्हाला विधानपरिषदेची पाचवी जागा जिंकता येते तरीही आम्ही निवडणूक बिनविरोध उमेदवार देऊ तरी त्यांनी ऐकले नाही.

महाविकास आघाडीला फटके खाल्ल्याशिवाय शहाणपण घेता येत नसेल तर आम्ही काय करणार. आम्ही विधान परिषदेतील सहाही जागा जिंकणार. हा आत्मविश्वास व गणित आहे. जर दाखून मतदान करायचे तिथे 11 मते जास्त आम्हाला मिळतात. इथे तर मतदान दाखवायचेच नाही. आम्हाला अनेकांनी हात दाखवून खूणवून सांगितले आहे. 300 टक्के असाच चमत्कार 20 जूनला विधान परिषदेच्या निवडणुकीत दिसेल, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT