Ajit Pawar, Eknath Shinde, Sanjay Raut, Chhagan Bhujbal Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "कमजोर हृदयाची माणसं पळून गेली"; भुजबळांचा दावा अन् राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Chhagan Bhujbal : "हे लोक बोलत आहेत, कारण त्यांना भीती यासाठी वाटत नाही कारण आता राज्यातील सरकार बदलणार आहे. शिवाय यांनी जे काही साध्य करायचं होतं ते मागील दोन वर्षात साध्य करून घेतलं आहे. छगन भुजबळ तुरूंगात जाऊन आले, प्रताप सरनाईक असतील अशा सगळ्यांनी आपल्या पक्षाच्या, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पळून गेले."

Jagdish Patil

Mumbai News, 08 Nov : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी ईडीपासून सुटका व्हावी यासाठी आपण भाजपसोबत गेलो, असं भुजबळ यांनी सांगितल्याचा दावा राजदीप सरदेसाई यांच्या पुस्तकात करण्यात आला आहे.

छगन भुजबळ यांच्या दाव्यामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवाय या दाव्यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला (Mahayuti) कोंडीत पकडण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांना आयतं कोलीत मिळालं आहे.

भुजबळांच्या याच दाव्यावर आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महायुतीवर जोरदार हल्लाबोल केला आहे. माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले, एकनाथ शिंदेंपासून अजित पवार हे सगळे ईडीच्या भीतीने भाजपसोबत गेले ईडी आणि सीबीआयपासून बचाव करण्यासाठी, आपली कातडी आणि प्रॉपर्टी वाचवण्यासाठी ते भाजपमध्ये गेले आहेत.

प्रफुल्ल पटेल भाजपसोबत (BJP) गेले नसते तर त्यांची इस्टेट मोकळी झाली नसती. भाजपमध्ये जाताच सध्या तरी त्यांच्या फायली बंद करण्यात आल्या आहेत. मग हसन मुश्रीफ असो वा दिलीप वळसे पाटील आणि शिवसेनेतून फुटून गेलेले आमच्या लोकांनी ईडीला घाबरून पलायन केलं आहे.

शिवाय आता हे लोक बोलत आहेत, कारण त्यांना भीती यासाठी वाटत नाही कारण आता राज्यातील सरकार बदलणार आहे. शिवाय यांनी जे काही साध्य करायचं होतं ते मागील दोन वर्षात साध्य करून घेतलं आहे. छगन भुजबळ तुरूंगात जाऊन आले, प्रताप सरनाईक असतील अशा सगळ्यांनी आपल्या पक्षाच्या, नेत्यांच्या पाठीत खंजीर खुपसला आणि पळून गेले, त्यानंतर त्यांची चौकशी बंद करण्यात आली.

तसंच या सर्वांप्रमाणे माझ्यावरही मोठा दबाव होता. अनिल परब, अनिल देशमुख यांच्यावर देखील दबाव होता. रवींद्र वायकर यांच्यावर दबाव होता पण ते भाजपमध्ये जाताच त्यांची फाईल बंद झाली. पक्षफोडीमागंच मुख्य हत्यार ईडीचा दबाव हेच होतं.

मात्र, आम्ही या दबावाला बळी पडलो नाही कारण आमचं आख्ख आयुष्य बाळासाहेब ठाकरेंसोबत गेलं आहे. आम्ही सांगितलं मरण पत्करू पण शरण जाणार नाही. पण काही कमजोर हृदयाची माणसं असतात शरीर वाघाचं आणि काळीज उंदराचं असतं, असे पळून गेले अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदेसेना आणि अजित पवार गटावर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT