Sanjay Raut, Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला पण...," आयकर विभागाने अजितदादांची प्रॉपर्टी मुक्त करताच राऊतांनी केलं अभिनंदन!

Sanjay Raut On BJP : आमच्याही सहकाऱ्यांच्या संपत्तीवर टाच आणली पण ते फक्त भारतीय जनता पक्षात गेले नाहीत म्हणून त्यांच्या प्रॉपर्टी मुक्त केल्या नाहीत. माझं तर राहतं घर जप्त केलं. माझी प्रॉपर्टी मुक्त करायला नकार दिला. तुम्ही पक्ष सोडलात तर सगळं मुक्त करू, असं सांगितलं गेलं पण आम्ही हे करायला नकार दिल्यामुळे आमची प्रॉपर्टी जप्त केली.

Jagdish Patil

Mumbai News, 07 Dec : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची आयकर विभागाने 2021 साली जप्त केलेली जवळपास 1000 कोटींची संपत्ती मुक्त करण्यात आली आहे. यावरून आता विरोधकांनी महायुती आणि भाजपवर टीका करायला सुरुवात केली आहे. अशातच आता ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर हल्लाबोल केला आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत (Sanjay Raut) यांनी अजित पवार यांचं अभिनंदन करत टोला लगावला. राऊत म्हणाले, आयकर विभागाने मुक्त केलेली संपत्ती ही बेकायदेशीर आणि भ्रष्टाचाराच्या पैशातून घेतलेली संपत्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी यांनी भोपाळमधून अजित पवारांचा 70 हजार कोटींचा भ्रष्टाचार बाहेर काढला होता. त्यावेळी आम्हाला वाटलं की सगळे आरोप ते सूडबुद्धीने करत आहेत.

मात्र, त्यानंतर लगेच त्यांच्या संपत्तीवर टाच आली आणि ताबडतोब काल शपथविधी सोहळा नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) उपस्थितीत झाला. त्यानंतर लगेचच केंद्र सरकारने इन्कम टॅक्सने आमच्या प्रिय अजितदादांची 1000 कोटींची संपत्ती ही स्वच्छ केली, मुक्त केली त्याबद्दल अजितदादा पवार सुनेत्रा वहिनी आणि पार्थ पवार यांचं मी खास अभिनंदन करतो.

आमच्याही सहकाऱ्यांच्या संपत्तीवर टाच आणली पण ते फक्त भारतीय जनता पक्षात गेले नाहीत म्हणून त्यांच्या प्रॉपर्टी मुक्त केल्या नाहीत. माझं तर राहतं घर जप्त केलं. माझी प्रॉपर्टी मुक्त करायला नकार दिला. तुम्ही पक्ष सोडलात तर सगळं मुक्त करू, असं सांगितलं गेलं पण आम्ही हे करायला नकार दिल्यामुळे आमची प्रॉपर्टी जप्त केली.

प्रफुल्ल पटेल यांची तर भाजपसोबत (BJP) जाताच आठव्या दिवशीच प्रॉप्रटी मोकळी केली. त्यांना भाजपने वॉशिंग मशिनमध्ये टाकून अनेक बेनामी प्रॉपर्टी मुक्त केली. मी अजितदादांचं अभिनंदन करतो. ते खूप अस्वस्थ आणि तणावात कारण हजारो कोटींची प्रॉपर्टी जप्त केल्यामुळे त्यांना पक्ष सोडावा लागला.

आपल्या वडिलांसमान काकांच्या पाठीत खंजीर खुपसावा लागला. मात्र, आज त्यांच्या तोंडावर विधानसभेत हास्य दिसेल त्याबद्दल आम्हालाही आनंद आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंनी अजित पवारांनी याच भीतीने पक्ष सोडला. हा विजय कट कारस्थानाचा आहे.

शिवाय शपथविधीनंतर चौथ्या दिवसांनी हजार कोटींची जप्त केलेली संपत्ती मोकळी केली जाते. आठ दिवस थांबा लोकांना विसरू द्या, एवढी घाई का करता पण हा सगळा निर्लज्ज पणाचा कारभार सुरू आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपवर हल्लाबोल केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT