Sanjay Raut, Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Sanjay Raut : "हा भोंगा गेले 20 ते 25 वर्ष…"; मशिदीवरील भोंगे उतरवण्याच्या राज ठाकरेंच्या वक्तव्यावरून राऊतांचा टोला

Sanjay Raut Criticize Raj Thackeray: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मशि‍दीवरील भोंग्यांच्या मुद्याला हात घातला आहे. 'माझ्या हातात सत्ता द्या 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरवतो', याचा पुनरुच्चार राज यांनी केला आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 08 Nov : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा मशि‍दीवरील भोंग्यांच्या मुद्याला हात घातला आहे.

'माझ्या हातात सत्ता द्या 48 तासात मशिदीवरील भोंगे उतरवतो', याचा पुनरुच्चार राज यांनी केला आहे. त्यांच्या याच वक्तव्यावरून आता शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.

माध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले, "हा भोंगा गेले 20 ते 25 वर्ष ऐकत आहोत. त्यासाठी सत्तेची अजिबात गरज नाही. तुम्ही प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे मोदी-शहांबरोबर आहात. तुम्ही देवेंद्र फडणवीसांबरोबर आहात, म्हणजेच तुम्ही सत्तेबरोबर आहात. तुमच्या हातात सत्ता येईल की नाही हा पुढचा प्रश्न आहे.

मात्र, पक्षाच्या कार्यक्रमाला सत्तेची गरज नसते. शिवसेनेने मागील 50 ते 55 वर्ष सत्तेशिवाय अनेक कार्यक्रम राबवले आहेत." अशा शब्दात त्यांनी राज ठाकरेंवर (Raj Thackeray) निशाणा साधला. दरम्यान, यावेळी त्यांनी 17 नोव्हेंबरला शिवाजी पार्कच मैदान ठाकरे गटालाच मिळावं अशी भूमिका मांडली.

ते म्हणाले, उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) जी भूमिका मांडली, ती प्रशासनाने गांभीर्याने घेण्याची गरज आहे. 17 नोव्हेंबरला बाळासाहेब ठाकरेंचा स्मृतिदिन असल्यामुळे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक येतील.

उद्धव ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळायला पाहिजे. पण एकदिवस आधी दुसऱ्या पक्षाने अर्ज केल्याने त्यांना ती जागा मिळत आहे. दिवसभर तिथे बाळासाहेबांच्या चाहत्यांचा राबता असणार आहे. बाळासाहेबांच्या भक्तांना अडवलं, तर संघर्ष होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच पावलं उचलणं गरजेच आहे, असं राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT