Mumbai News, 28 Feb : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे (Shivsena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे हे सतत भाजपच्या हिंदुत्वावर टीका करत असतात. भाजपचं हिंदुत्व हे केवळ सत्तेसाठी असल्याचा आरोप ठाकरे करत असतात. धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटेंचं रक्षण करणं हेच भाजपचं हिंदुत्व आहे का? असा सवालही त्यांनी याआधी उपस्थित केला होता.
तर नुकत्याच पार पडलेल्या महाकुंभमेळ्यावरुन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाकरेंवर टीका केली होती. "काही लोक स्वतःला हिंदू म्हणवून घेण्यास घाबरतात", असा टोला शिंदेंनी ठाकरेंना लगावाला होता. यावर, "महाराष्ट्राशी गद्दारी करून केलेलं पाप अनेकवेळा गंगेत स्नान करूनही धुतले जाणार नाही. गंगेत उडी मारून देशद्रोहाचं लेबल हटत नाही"; असं प्रत्युत्तर ठाकरेंनी दिलं होतं.
ठाकरेंनी हिंदुत्वावर केलेल्या वक्तव्यावरून आणि त्यांनी महाकुंभात न जाण्यावरून भाजप नेते तथा राज्याचे माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी बोचरी टीका केली आहे. शेलार यांनी एक्सवर एक पोस्ट करत ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, अयोध्येत प्रभू रामाचे भव्य मंदिर उभे राहिले महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर कोट्यवधी श्रध्दाळू दर्शन करुन आले. आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरील "छावा" (Chhaava) सिनेमा आला महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी लोकांनी तो पाहिला.
"छावा" वर महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी आणि त्यांचा "सामना" सोडून जगभरातील लिहिणारे, बोलणारे बोलत आहेत. स्वागत करीत आहेत. कुंभमेळा भरला. महाराष्ट्रातील ढोंगी हिंदुत्ववादी सोडले तर जगभरातील कोट्यवधी भाविक सहभागी होऊन पवित्र स्नान करुन आले.
सभेत दाखवण्यापुरती हातात रुद्राक्षाची माळ घाली औरंगजेबाचा जप ज्यांच्या सदैव तोंडी ओळखलेत का? महाराष्ट्रातील ते हिंदुत्ववादी ढोंगी?", असं म्हणत त्यांनी ठाकरेंना डिवचलं आहे. त्यामुळे शेलारांच्या या टीकेला आता ठाकरे गट काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.