Uddhav Thackeray, Devendra Fadnavis
Uddhav Thackeray, Devendra Fadnavis sarkarnama
मुंबई

Shiv sena : फडणवीस 'उपमुख्यमंत्री' झाले ही उपरवाले की मेहरबानी ; ठाकरेंचा टोला

सरकारनामा ब्युरो

़मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) शिवसेनेतील बंडखोरी आणि राज्यातील बदलते राजकारण यावर विस्तृतपणे आज बोलले. शिवसेनेतील बंडखोरीनंतर त्यांनी पक्षसंघटना मजबूत करण्यावर भर दिला आहे. तरीही त्यांची विस्तृत अशी भूमिका पुढे आली नव्हती. ही भूमिका आज पुढे येणार आहे. दैनिक सामनाचे संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी त्यांची मुलाखत घेतली. मुलाखतीचा आज दुसरा आणि शेवटचा भाग प्रदर्शित करण्यात आला. १ आँगस्टपासून उद्धव ठाकरे पुन्हा सक्रिय होणार आहेत. (Shiv sena news update)

राज्यात सत्तासत्ता झाल्यानंतर पत्रकार परिषदेत भाजपचे नेते, देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे यांचे नाव जाहीर केले. दिल्लीतील पक्षश्रेष्ठींमध्ये चर्चा झाल्यानंतर फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.

या सर्व घडामोडीबाबत फडणवीसांसोबत भाजप अशी का वागली? असा प्रश्न राऊतांनी ठाकरेंना विचारला. त्याला ठाकरेंनी खोचकपद्धतीने उत्तर दिले. 'फडणवीस उपमुख्यमंत्री झाले ही उपरवालेची मेहरबानी,' अशा शब्दात ठाकरेंनी टोला लगावला. फडणवीसांबाबत भाजप अशी का वागवी, हे कळालं नाही, असे ठाकरे म्हणाले,

ठाकरेंनी यावेळी एकनाथ शिंदे गट, भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीकास्त्र डागले. ते म्हणाले, "शिंदेच्या रक्तात सत्तापिपासूपणा आहे. विश्वासघातकी शिंदेंना मुख्यमंत्री व्हायच होतं.शिवसैनिकांच्या अश्रूंची किंमत शिंदेंना मोजावी लागेल, असे ठाकरे म्हणाले.

"शिंदे वाईट पद्धतीने मुख्यमंत्री झाले. भाजपच्या डोक्यावर निष्ठावंताचे उपरे आहे, देशातील सत्ताधाऱ्यांची पावले हकुमशाहीकडे वळू लागले आहेत," अशी टीका ठाकरेंना केली.

शिवसेना आमदारांचा एक मोठा गट फुटल्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात अनेक बदल झाले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे या पितापुत्रांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर पुन्हा एकदा भर दिला. शिवसेनेच्या शाखेपासून ते संपर्क प्रमुखांपर्यंत पक्ष भक्कम करण्यास सध्या प्राधान्य आहे. त्यामुळे शिवसेनाभवन आणि मातोश्री येथे सध्या बैठकांचा सिलसिला सुरु आहे. दुसऱ्या बाजूला आदित्य ठाकरे महाराष्ट्रात विविध दौरे करुन वातावरण ढवळून काढत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT